Ratnagiri Nagar Parishad Election Result 2025: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेना, भाजप युतीचा झेंडा, सात पैकी सहा ठिकाणी युतीचा नगराध्यक्ष
By मनोज मुळ्ये | Updated: December 21, 2025 12:18 IST2025-12-21T12:16:08+5:302025-12-21T12:18:38+5:30
केवळ एक नगराध्यक्ष पद महाविकास आघाडीच्या काँग्रेसला मिळाले

Ratnagiri Nagar Parishad Election Result 2025: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेना, भाजप युतीचा झेंडा, सात पैकी सहा ठिकाणी युतीचा नगराध्यक्ष
रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेना आणि भाजप युतीने मोठे यश मिळवले आहे. जिल्ह्यातील सात पैकी सहा नगराध्यक्ष पदे युतीने मिळवली असून, केवळ एक नगराध्यक्ष पद महाविकास आघाडीच्या काँग्रेसला मिळाले आहे.
रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शिंदे सेनेच्या शिल्पा सुर्वे, लांजा नगरपंचायतीत शिंदे सेनेच्या सावली सुनील कुरूप चिपळूणमध्ये शिंदे सेनेचे उमेश सकपाळ, खेडमध्ये शिंदे सेनेच्या माधवी बुटाला, गुहागरमध्ये भाजपच्या नीता मालप, देवरुखमध्ये भाजपाच्या मृणाल शेट्ये यांनी विजय मिळवला आहे.
सात ठिकाणच्या निवडणुकांमध्ये सहा नगराध्यक्ष पदे शिंदेसेना आणि भाजप युतीला मिळाली आहेत. महाविकास आघाडीला केवळ राजापूरमध्ये नगराध्यक्ष पद मिळवता आले. तेथे काँग्रेसच्या माजी आमदार, माजी नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे विजयी झाल्या आहेत