रत्नागिरी - संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणाचा आईनेच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:01 IST2018-09-18T16:59:01+5:302018-09-18T17:01:55+5:30

सोमवारी संशयास्पद मृत्यू झालेल्या पोफळी येथील विक्रांत राजाराम पवार याचा खून त्याच्या आईनेच, राजश्री पवार हिनेच केला असल्याचे आज पोलीस तपासात उघड झाले आहे

Ratnagiri - The mother of the suspect died and the mother murdered | रत्नागिरी - संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणाचा आईनेच केला खून

रत्नागिरी - संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणाचा आईनेच केला खून

ठळक मुद्देलहानग्या नातीचा विनयभंग करण्याचा प्रयत्नशरीरावरील जखमा पाहता पोलिसांना शंका

रत्नागिरी - सोमवारी संशयास्पद मृत्यू झालेल्या पोफळी येथील विक्रांत राजाराम पवार याचा खून त्याच्या आईनेच, राजश्री पवार हिनेच केला असल्याचे आज पोलीस तपासात उघड झाले आहे. मद्यपी विक्रांतकडून तीन वर्षे होणारा त्रास आणि मारहाण याला कंटाळूनच आपण विक्रांतला मारहाण केल्याची कबुली राजश्री पवार हिने दिली आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हा प्रकार पोफळी पवारवाडी येथे घडला आहे. सोमवारी सकाळी विक्रांतचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. रात्री तो मद्यपान करुन घरी आला, तेव्हा त्याच्या अंगावर जखमा होत्या. त्याचा अपघात झाला होता असे त्याच्या आईने राजश्री पवार हिने पोलिसांना सांगितले होते. मात्र त्याच्या शरीरावरील जखमा पाहता पोलिसांना शंका आली. राजश्री हिच्याकडे केलेल्या चौकशीत आपणच विक्रांतला मारहाण केल्याची कबुली तिने दिली.

गेली तीन वर्ष तो मद्यपान करुन आपल्याला व आपल्या मुलीला मारहाण करत होता. १६ सप्टेंबरलाही त्याने तसेच केले. त्यातच त्याने लहानग्या नातीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण त्याला काठीने मारहाण केली आणि दोरीने गळा आवळला, अशी कबुली राजश्री हिने दिली आहे.
 

Web Title: Ratnagiri - The mother of the suspect died and the mother murdered