रत्नागिरी : पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी कऱ्हाड येथील एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 14:28 IST2018-10-16T14:25:17+5:302018-10-16T14:28:16+5:30
पोलिसाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी घटनास्थळावरून पळून गेलेल्या आत वाहनाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी कऱ्हाड (जि. सातारा) येथील एकाला अटक करण्यात आले असून, त्याची गाडी जप्त करण्यात आली आहे.

रत्नागिरी : पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी कऱ्हाड येथील एकाला अटक
शिरगाव (चिपळूण) : पोलिसाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी घटनास्थळावरून पळून गेलेल्या आत वाहनाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी कऱ्हाड (जि. सातारा) येथील एकाला अटक करण्यात आले असून, त्याची गाडी जप्त करण्यात आली आहे.
दि. ११ आॅक्टोबर रोजी अलोरे येथे पुलावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय विठ्ठल सुर्वे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. ते वाहन अंगावरून गेल्याने सुर्वे जागीच ठार झाले होते. अपघातग्रस्त वाहनचालक तेथे न थांबताच निघून गेला.
या वाहनाचा शोध लावण्यासाठी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकाच्या निरीक्षक निशा जाधव यांनी एक स्वतंत्र पथक नेमले होते.
या पथकाने सीसीटीव्ही फुटेजसह विविध पर्याय वापरून केलेल्या तपासाअंती कऱ्हाड येथील वाहनचालक दीपक चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी या अपघाताची कबुली दिली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. दीपक चव्हाण हा भाजीपाल्याची वाहतूक करतो.