Ratnagiri: रत्नागिरीत मित्रावर चाकूचे वार; एकजण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 00:06 IST2023-04-12T00:05:31+5:302023-04-12T00:06:36+5:30
Crime News: घरी राहायला आलेल्या मित्रावर मित्रानेच धारधार सुऱ्याने सात वार केल्याची घटना मंगळवारी (११ एप्रिल) रात्री ८:४५ वाजण्याच्या दरम्यान घडली. घरगुती वादातून हे वार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Ratnagiri: रत्नागिरीत मित्रावर चाकूचे वार; एकजण गंभीर
रत्नागिरी : घरी राहायला आलेल्या मित्रावर मित्रानेच धारधार सुऱ्याने सात वार केल्याची घटना मंगळवारी (११ एप्रिल) रात्री ८:४५ वाजण्याच्या दरम्यान घडली. घरगुती वादातून हे वार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या हल्ल्यात रेहान बाबामियॉं मस्तान हा जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर हल्ला करणाऱ्या विनायक हेडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रत्नागिरी शहरानजिकच्या खेडशी येथे हा प्रकार घडला. जखमी रेहान बाबामियॉं मस्तान हा हिस्ट्रीसीटर असल्याचे पुढे आले आहे. तो गेल्या १ महिन्यापासून त्याचा मित्र विनायक हेडगे याच्याकडे रहायला होता. गेले काही दिवस त्यांच्यात वाद सुरू होते. त्यातूनच हा हल्ला झाल्याचा संशय आहे. रेहान याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, विनायक याने हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरुन केला याचे उत्तर मिळालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.