दरडोई उत्पन्नात रत्नागिरी जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर, गतवर्षीच्या तुलनेत २५,८८८ची वाढ 

By शोभना कांबळे | Published: July 19, 2023 06:41 PM2023-07-19T18:41:58+5:302023-07-19T18:42:39+5:30

अर्थ व सांख्यिकीय उपसंचालक निवास यादव यांची माहिती

Ratnagiri district ranks eighth in the state in per capita income, an increase of 25,888 over last year | दरडोई उत्पन्नात रत्नागिरी जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर, गतवर्षीच्या तुलनेत २५,८८८ची वाढ 

दरडोई उत्पन्नात रत्नागिरी जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर, गतवर्षीच्या तुलनेत २५,८८८ची वाढ 

googlenewsNext

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा दरडोई उत्पन्नात राज्यात ८व्या क्रमांकावर आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५ हजार ८८८ची वाढ झाली असल्याची माहिती अर्थ व सांख्यिकीय उपसंचालक निवास यादव यांनी दिली.
अर्थ व सांख्यिकीय संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांनी याबाबत राज्याची जिल्हावार माहिती https://mahades.maharashtra.gov.in/files/report/SIES-DISTRICT_2011-12_2021-22.pdf या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे.

दरडोई उत्पन्न काढण्यासाठी २०११-१२ हे वर्ष पायाभूत धरण्यात आले आहे. त्यावर्षी जिल्ह्याची दरडोई उत्पन्न हे ८४ हजार ८३३ रुपये इतके होते. मागील वर्षी म्हणजेच २०२१-२२ला १ लाख ७१ हजार १९६ रुपये इतके होते. आता ते २५ हजार ८८८ रुपयांनी वाढून सन २०२१-२२ला २ लाख १ हजार ४८ रुपये इतके झाले आहे.

कृषी ५ हजार ७६७, पशुसंवर्धन १ हजार ३५, वने व लाकूड तोडणी १ हजार ५७२, मस्त्यव्यवसाय ९३१, कृषी आणि कृषी पूरक ९ हजार ३०५, खाण व दगड खाणकाम १४०, वस्तू निर्माण ४ हजार १३, बांधकाम १ हजार ७६० तसेच उद्योग ६ हजार ४४७ या निव्वळ जिल्हा उत्पन्न क्षेत्रवारांचा यात समावेश आहे.

Web Title: Ratnagiri district ranks eighth in the state in per capita income, an increase of 25,888 over last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.