शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Maharashtra रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी वाढले २६ रूग्ण, सहावा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 09:54 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मुंबईतून आलेल्या एका ४९ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरु होता. तो रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील एका गावामध्ये १५ दिवसांपूर्वी आला होता़ त्याला गावाच्या जवळच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देआणखी २५ जण कोरोना पॉझिटिव्हकोरोनाबाधितांची संख्या २३४, मुंबईतील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत होता.

रत्नागिरी : शनिवारची पहाट रत्नागिरी जिल्ह्यासाठी धक्कादायक ठरली. शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना रूग्णांमध्ये तब्बल २६ रूग्णांची भर पडली आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २३४ झाली आहे. मुंबईहून आलेल्या आणखी एका कोरोनाबाधित ४९ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ हा जिल्ह्यातील सहावा बळी ठरला आहे.जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०८ होती. त्यामध्ये आणखी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २३४ झाली आहे़ त्यामध्ये चिपळूणातील कामथे रुग्णालयातील १२, राजापूरमधील ४, रत्नागिरीतील ६, खेड कळंबणी रुग्णालयातील ३ आणि संगमेश्वर तालुक्यात एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मुंबईतून आलेल्या एका ४९ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरु होता. तो रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील एका गावामध्ये १५ दिवसांपूर्वी आला होता़ त्याला गावाच्या जवळच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला दम्याचा आजार होता़ तो मुंबईतील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच शनिवारी त्याचे निधन झाले. कोरोनाबाधित रुग्णाचा अंतिम संस्कार रत्नागिरी करण्यात करण्यावरुन काही जणांनी जोरदार विरोध केल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर रत्नागिरी शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात त्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले़

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRatnagiriरत्नागिरी