शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

Cabinet expansion: रत्नागिरी जिल्ह्याला तब्बल २९ वर्षांनी मिळाली दोन मंत्रिपदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 18:34 IST

रत्नागिरी : तब्बल २९ वर्षांनी रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. नव्याने तयार झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय ...

रत्नागिरी : तब्बल २९ वर्षांनी रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. नव्याने तयार झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापोलीचे आमदार योगेश कदम या दोघांची मंत्रीमंडळामध्ये वर्णी लागली आहे. १९९५ मध्ये जिल्ह्यातील दोन आमदारांना मंत्रिपद मिळाले होते आणि योगायोगाने तेव्हाही युतीचेच सरकार होते.रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांचे मंत्रिपद आधीपासूनच निश्चित होते, त्यात आता योगेश कदम यांनी बाजी मारली आहे. याआधी १९९५ साली ज्यावेळी शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आले, त्यावेळी मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळामध्ये संगमेश्वरचे आमदार रवींद्र माने आणि खेडचे आमदार रामदास कदम या दोन मंत्र्यांचा समावेश होता. त्यानंतर तब्बल २९ वर्षांनी आता जिल्ह्याला पुन्हा दोन मंत्रिपदे मिळाली आहेत.१९९९ आणि २००४ या दोन टर्ममध्ये जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप युतीचे आमदार अधिक असले, तरी राज्यात सत्ता नव्हती. त्यामुळे या दोन्ही काळामध्ये म्हणजेच सलग दहा वर्षे जिल्ह्यात बाहेरील पालकमंत्रीच नेमण्यात आले होते २००९ साली काँग्रेस आघाडीच्या सत्तेत गुहागरचे आमदार भास्कर जाधव मंत्री झाले. २०१३ साली त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर रत्नागिरीचे तरुण आमदार उदय सामंत मंत्री झाले. मात्र, त्यानंतर २०१४ ते १९ या काळात शिवसेना-भाजपची सत्ता असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये रत्नागिरीतील एकाही आमदाराला मंत्रिपद मिळाले नाही.२०१९ मध्ये उद्धवसेना स्वतंत्र झाली आणि महाविकास आघाडीची सत्ता आली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात उदय सामंत यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्रिपद मिळाले. अडीच वर्षांपूर्वी राजकीय समीकरणे बदलल्यामुळे महायुतीची सत्ता आली आणि उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याच्या मंत्रिपदासह रत्नागिरीचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले. मात्र, १९९५ नंतर २०२४ च्या निवडणुकीपर्यंत जिल्ह्यात कधीही दोन मंत्रिपदे मिळाली नाहीत. याउलट यातील बराचसा काळ पालकमंत्री जिल्ह्याबाहेरीलच नेमला गेला होता. आता २०२४ च्या निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत असल्याने जिल्ह्यात शिंदे सेनेच्या कोट्यातूनच दोन मंत्रिपदे मिळत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शब्द खरा केलानिवडणुकीआधी दापोली येथे झालेल्या योगेश कदम यांच्यासाठीच्या प्रचार सभेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘तुम्ही मला आमदार द्या, मी त्याला नामदार करतो’, असे आश्वासन मतदारांना दिले होते. एकनाथ शिंदे यांनी आपला हा शब्द खरा केला असून, योगेश कदम यांनी रविवारी राज्यमंत्रिपदासाठी शपथ घेतली आहे.

दुसऱ्या टर्ममध्ये मंत्रिपदरत्नागिरीचे आमदार उदय सामंत २००४ साली सर्वात प्रथम निवडून आले. २००९ साली ते दुसऱ्यांदा निवडून आले आणि त्या टर्मच्या शेवटच्या काही महिन्यांसाठी त्यांना राज्यमंत्रिपदासह रत्नागिरीचे पालकमंत्री पद देण्यात आले. योगेश कदम यांना मात्र आपल्या दुसऱ्या टर्मच्या सुरुवातीलाच मंत्रिपद मिळाले आहे.

उदय सामंत यांनी चौथ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथरत्नागिरीचे आमदार उदय सामंत आता चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. २०१३ साली त्यांनी मंत्रिपदाची पहिल्यांदा शपथ घेतली, त्यावेळी त्यांच्याकडे नऊ खात्यांचे राज्यमंत्रिपद होते. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सत्तेत त्यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद होते. त्यानंतर २०२२ मध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर उदय सामंत यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांच्याकडे उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. आता उदय सामंत यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्याकडे आधीचे उद्योग खातेच कायम राहणार की, त्यांना त्यापेक्षा आणखी चांगले खाते देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारUday Samantउदय सामंतYogesh Kadamयोगेश कदम