शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

रत्नागिरी जिल्ह्यात १७२८ जणांना श्वानदंश, भटक्याची दहशत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:28 PM

रत्नागिरी जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत वाढली असून, शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी जाणे फारच कठीण झाले आहे़ या वर्षभरामध्ये जिल्हाभरात श्वानांनी १७२८ जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत़.

ठळक मुद्दे गल्लोगल्ली दहशत, अँटी रेबीज व्हॅक्सीनचे उत्पादन कमी, नसबंदीची गरजअँटी रेबीज व्हॅक्सीन या लसीचे उत्पादनही कमी प्रमाणात

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत वाढली असून, शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी जाणे फारच कठीण झाले आहे़ या वर्षभरामध्ये जिल्हाभरात श्वानांनी १७२८ जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत़ .

एकाच गावामध्ये एकाच दिवशी १० ते १५ जणांचा श्वानांनी चावा घेतल्याचे समोर आले असले तरीही श्वानदंशामुळे कोणीही दगावल्याची नोंद जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे नाही़.जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये विंचूदंश, शेतीच्या कामावेळी सर्पदंशाच्या अनेक घटना दरवर्षी घडत असतात़ जिल्हाभरात दरवर्षी श्वानांची संख्या वाढत चालली आहे़ श्वानांची गणना दर पाच वर्षांनी होत असते़ सन २०१२ मध्ये श्वानांची गणना करण्यात आली होती़

मात्र, त्यानंतर गणना करण्याची वेळ आली तरीही ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही़ जिल्हाभरात लाखो भटके श्वान असून, पाळीव श्वानांपेक्षा कित्येक पटीत उनाड, भटक्या श्वानांची आहे़ त्यामुळे आता या श्वानांच्या नसबंदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गल्लीबोळामध्ये उनाड, भटके श्वान मोठ्या संख्येने दिसून येतात़ रात्रीच्या वेळी तर ये-जा करणारे पादचारी, दुचाकीस्वार यांच्यावर श्वानांनी हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत़. त्यामुळे जिल्ह्यात या वर्षभरात १७२८ जणांचा श्वानांनी चावा घेतला आहे़.

यामध्ये शाळकरी मुलांसह आबालवृध्दांचाही समावेश आहे़ या जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येतात़ श्वान चावल्यानंतर त्यावर देण्यात येणाऱ्या अँटी रेबीज व्हॅक्सीन या लसीचे उत्पादनही सध्या कमी प्रमाणात होत असल्याचे समजते.

राज्यभरातील जिल्हा परिषद आरोग्य विभागांकडून मागणी करुनही त्यांना वेळेवर या लसीचा पुरवठा शासनाकडून केला जात नाही़ त्यामुळे भविष्यात श्वानदंशावरील लस कमी पडल्यास मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे़श्वानांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्यातालुका                 रुग्ण

  1. मंडणगड             ८६
  2. दापोली              २०२
  3. खेड                  १२९
  4. गुहागर             १२९
  5. चिपळूण           ३०९
  6. संगमेश्वर          १६४
  7. रत्नागिरी           ४८६
  8. लांजा                    ८८
  9. राजापूर               १३५एकूण                 १७२८नसबंदीही त्रासदायकचश्वानांची नसबंदी झाली पाहिजे, हा पर्याय सहज पुढे आणला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यावर अंमलबजावणी करणे अत्यंत अवघड असल्याने त्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यातील नियमानुसार नसबंदीनंतर श्वानांची चार दिवसांची देखभाल करणे बंधनकारक आहे, ही अटच त्रासदायक आहे. 

जिल्ह्यात श्वानांमुळे शहरासह ग्रामीण भागातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ कारण दररोज श्वान चावल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत़ दरवर्षी जिल्ह्यात १० ते १५ हजार अँटी रेबीज व्हॅक्सीन या लसीची आवश्यकता असते़ त्यासाठी तीन महिन्याला पुरेल, असा लसीचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ठेवण्यात येतो़ त्यासाठी शासनाकडे मागणीही करण्यात येते़- डॉ़ अनिरुध्द आठल्ये,जिल्हा आरोग्य अधिकारी़

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdogकुत्रा