शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

रत्नागिरी : सायबर गुन्ह्यांचा विळखा मजबूत होतोय, गुन्हेगारीची पाळेमुळे खोलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 11:55 IST

इंटरनेट क्रांती ही आजवरची सर्वात मोठी क्रांती मानली जात असली तरी लोकांचा पैसा आणि खासगी आयुष्य आणि गोपनीयता याला सायबर गुन्ह्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. सन २०१६मध्ये ४४ सायबर गुन्ह्यांची प्रकरणे नोंद झाली आणि २०१७मध्ये ही संख्या तब्बल ५२ वर गेली आहे.

ठळक मुद्देसायबर गुन्ह्यांचा विळखा मजबूत होतोयगुन्हेगारीची पाळेमुळे खोलवर- गोपनीय माहिती न देण्याची सवय ठेवा- झटपट श्रीमंतीचे स्वप्न नकोच

अरूण आडिवरेकररत्नागिरी : इंटरनेट क्रांती ही आजवरची सर्वात मोठी क्रांती मानली जात असली तरी लोकांचा पैसा आणि खासगी आयुष्य आणि गोपनीयता याला सायबर गुन्ह्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. सन २०१६मध्ये ४४ सायबर गुन्ह्यांची प्रकरणे नोंद झाली आणि २०१७ मध्ये ही संख्या तब्बल ५२ वर गेली आहे.

बँकेतून मॅनेजर बोलतोय. एटीएम बंद होणार आहे, पीन नंबर सांगा असे सांगून फसवणूक होण्याचे प्रकार सर्वाधिक आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी झालेल्या गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिसांना शंभर टक्के यश आले आहे. झारखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्ली हे भाग फसवणुकीचे मुख्य केंद्र असल्याची माहिती सायबर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितले.आॅनलाईन बँकिंग, आॅनलाईन खरेदी, मेसेजिंग, ई-गव्हर्नस, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर, व्हिडिओ कॉल यामुळे देशांच्या सीमारेषा पुसून गेल्या असून, जगातील लोक एकमेकांच्या अगदी जवळ आले आहेत. वाढत्या इंटरनेटच्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारीची पाळेमुळेदेखील अधिक दूरवर पोहोचली आहेत.

माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे दैनंदिन व्यापार तसेच इतर अनेक व्यवहार करणे लोकांना सोयीस्कर झाले असले तरीही त्याचबरोबर त्यातील गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. हॅकींगच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार, तसेच अनेक प्रकारे आर्थिक फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर उघडकीला येत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह छायाचित्रे, प्रक्षोभक संदेश पाठवणे यासारख्या गुन्ह्यांची नोंद सायबर क्राईममध्ये करण्यात येते.गेल्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात सायबरचे ५२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये बँकेतून मॅनेजर बोलतोय सांगून फसवणूक झालेले ३४, सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे बदनामी झाल्याचे १०, आॅनलाईन फसवणुकीसह लॉटरी लागल्याचे सांगून, बनावट एटीएम वापरून, भीम अ‍ॅपविषयी लिंक अकाऊंटची माहिती घेऊन, टाईल्स विक्रीच्या व्यवसायाद्वारे फसवणूक आणि अ‍ॅमेझॉनवर तुम्हाला बक्षीस लागल्याचे सांगून फसवणूक झाल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. रत्नागिरीत आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक आहे.झारखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्ली ही फसवणूक करणाऱ्यांची केंद्र आहेत. मात्र, या व्यक्ती एका जागेवर स्थिर राहत नसल्याने त्यांचा शोध घेणे कठीण असते. गतवर्षी चिपळूण आणि सावर्डे येथील गुन्ह्यांप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांनाही झारखंडमधूनच ताब्यात घेण्यात आले होते.

अनेकदा अशा गुन्ह्यांमध्ये संबंधितांना पकडणे खूप कठीण असते. ज्या खात्यावर पैसे टाकले जातात, ते खातेदेखील तात्पुरत्या स्वरूपाचे असते. दिवसाचे टार्गेट पूर्ण झाले की, ही मंडळी आपले बस्तान दुसरीकडे हलवतात. एखाद्याची फसवणूक झाल्यास त्याला त्याची रक्कम मिळणे गरजेचे असते. त्यामुळे फसवणूक झाल्यानंतर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.सायबर क्राईम गुन्ह्यांअंतर्गत सन २०००मध्ये कायदा अंमलात आला आहे. यामध्ये ६६ ते ७४ असे सेक्शन असून, या सेक्शननुसार त्या व्यक्तीवर आरोप सिद्ध झाल्यास १ वर्ष ते ७ वर्षापर्यंत तुरूंगवास आणि १० लाखांपर्यंत दंड ठोठावण्यात येऊ शकतो, अशी माहिती रविराज फडणीस यांनी दिली.

आमिषाला बळी पडू नकाझटपट श्रीमंत होण्याच्या आमिषामुळे अनेकजणांची फसवणूक होते. लॉटरी लागली आहे, पैसे मिळणार आहेत, असे फोन आल्यावर माणूस मोहाला बळी पडतो. त्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तुमच्या खात्यातून पैसे अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्यास तत्काळ पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा.- रविराज फडणीसपोलीस उपनिरीक्षक,सायबर, रत्नागिरी.

 

व्हॉट्सअ‍ॅपचा आॅल इंडियाचा ग्रुप

सायबर गुन्ह्यांचा शोध तातडीने लागण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा आॅल इंडिया ग्रुप तयार करण्यात आला आहे. फसवणुकीचा प्रकार घडताच या ग्रुपवर त्याची माहिती टाकल्यास तत्काळ कारवाई केली जाते. याठिकाणी माहिती टाकल्यास काही क्षणातच सर्व यंत्रणा काम करते.मुलांवर लक्ष गरजेचेअनेकवेळा मोबाईलवरून मुले आॅनलाईन खरेदी किंवा विविध साईटस् बघत असतात. त्यामुळे आपली गोपनीय माहिती त्याद्वारे इतरांना जाऊ शकते. मुले मोबाईल हाताळताना किंवा इंटरनेटचा वापर करताना काय पाहतात ते पहा.योग्य वेबसाईटसच पाहाव्यातइंटरनेटचा वापर करताना आपण अनेक साईटस् पाहतो. या साईटस् पाहताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशा साईटस् सुरू करण्यापूर्वी  https// असे लिहिले आहे का? ते पाहावे. या अक्षरांमधील एस हे अक्षर ती साईट सुरक्षित असल्याचे दर्शवते.ओटीपी नंबर कुणालाही देऊ नकाआॅनलाईन खरेदी करताना रजिस्टर केलेल्या नंबरवर ओटीपी नंबर येतो. हा नंबर ग्राहकाने कोणालाही कधीच सांगू नये. हा नंबर घेऊन अनेकजण आॅनलाईन पैसे काढण्याची शक्यता असते.एटीएम वापरताना काळजी घ्याएटीएमचा वापर करणाऱ्या व्यक्तीने ते वापरताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. एटीएम कार्ड वापरताना आजूबाजूला कोणी व्यक्ती नाही ना याची खबरदारी घ्यावी. आपले एटीएम कार्ड दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये किंवा त्यांचा नंबर कोणाला सांगू नये.बँकेतून कधीच फोन येत नाहीएटीएम कार्ड बंद होणार असल्याबाबत कधीच कोणतीही बँक ग्राहकाला स्वत:हून फोन करत नाही. त्यामुळे असे फोन हे केवळ ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशानेच केले जातात. त्यामुळे असा फोन आल्यास ग्राहकांनी आपली माहिती देण्याऐवजी बँकेशी संपर्क साधावा.व्हॉट्सअ‍ॅपवर नोंदवा तक्रारनागरिकांची फसवणूक झाल्यास त्यांना तत्काळ पोलीस स्थानकात तक्रार देता यावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून व्हॉट्सअ‍ॅप नंबर देण्यात आला आहे. ८८८८५०६१८१ या क्रमांकावरून तत्काळ आपली तक्रार देता येऊ शकते. त्याची दखलही तत्काळ घेतली जाते.