सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:59 PM2018-01-19T23:59:53+5:302018-01-20T00:00:03+5:30

सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत विद्यार्थ्यांसह नागरिकांना पुरेपूर माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील हॉलमध्ये गुरूवारी विशेष मार्गदर्शनात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आय. सी. आय.सी.आय. बँक.....

Public awareness campaign about cyber crime | सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियान

सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियान

googlenewsNext
ठळक मुद्देसायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून.....

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत विद्यार्थ्यांसह नागरिकांना पुरेपूर माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील हॉलमध्ये गुरूवारी विशेष मार्गदर्शनात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आय. सी. आय.सी.आय. बँक नागपूरचे व्यवस्थापक कमलेश वालदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
इंटरनेट क्रांती ही आजवरीची सर्वात मोठी क्रांती मानली जाते. इंटरनेटने सर्वत्र क्षेत्रात प्रवेश केला आहे. आॅनलाईन बॅकींग, आॅनलाईन खरेदी, मेसेजींग, ई-गव्हर्नस, फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, टिष्ट्वटर, व्हीडीओ कॉल इत्यादी गोष्टीमुळे देशाच्या सिमारेषाही पुसून गेल्या असून जगातले लोक खूप जवळ आले आहेत. वाढत्या इंटरनेटच्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या नवनवीन पद्धती शोधून लोकांचा पैसा आणि खासगी गोपनियता याला मोठा धोका निर्माण केला आहे. इंटरनेटचे तंत्रज्ञान वारंवार बदलत असल्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आवाहन सध्या आहे. त्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ट्रान्सफोरमिंग महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती अभियान राबविण्याचे निश्चित केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वालदे यांनी बॅक फ्रॉड, आॅनलाईन फ्रॉड, जॉब फ्रॉड, सोशल मिडीया फ्रॉड याबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाला पराग पोटे, डी. बी.गुरव, बी.डी. मोहदुळे, संजय देवरकर, कुलदीप टांकसाळे, निलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर, कावळे, अक्षय राऊत, अभिजीत वाघमारे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Public awareness campaign about cyber crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.