रत्नागिरी : भारजा नदीपात्रातील मगरीचा ग्रामस्थावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 14:18 IST2018-08-11T14:16:11+5:302018-08-11T14:18:14+5:30
भारजा नदी पात्रातील एका मगरीने आपला आवास सोडून पिंपळोली गावातील ग्रामस्थ अल्ताफ पेटकर यांना चावा घेतल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आपला नेहमीचा सुरक्षित आवास सोडून मानवी वस्तीकडे मोर्चा वळवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याचबरोबर ग्रामस्थ अल्ताफ पेटकर मगरीने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्याने त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

रत्नागिरी : भारजा नदीपात्रातील मगरीचा ग्रामस्थावर हल्ला
मंडणगड : भारजा नदी पात्रातील एका मगरीने आपला आवास सोडून पिंपळोली गावातील ग्रामस्थ अल्ताफ पेटकर यांना चावा घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, आपला नेहमीचा सुरक्षित आवास सोडून मगरीने मानवी वस्तीकडे मोर्चा वळवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याचबरोबर ग्रामस्थ अल्ताफ पेटकर मगरीने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्याने त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मृत मगर केळवत घाटात टाकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या घटनेची माहिती मिळताच तालुक्यातील नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी याची माहिती वन विभागाला देण्यात आली. यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
मृतावस्थेत आढळलेली मगर वन विभागाने ताब्यात घेऊन दापोली येथे विच्छेदन करुन जाळून टाकल्याची माहिती मिळाली आहे. भारजा नदी सोडून गावात येऊन मगरीने रस्त्यालगत असलेल्या गवतातून येऊन पेटकरांना चावा घेतला.
यामागचे कारण शोधण्याची खरोखर वेळ आली आहे. मगरीने स्वत:चा अधिवास सोडून मानवी वस्तीकडे धाव घेतल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे.