रत्नागिरी : बलात्काराचा प्रयत्न करून आरोपीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:02 IST2019-01-08T14:01:16+5:302019-01-08T14:02:50+5:30

गुहागर तालुक्यातील असोरे- गोंधळेवाडी येथील प्रशांत वसंत गोंधळी (३५) याने ३० वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्याने तिच्यावर हल्ला केला. मात्र, या सर्व घटनेनंतर पश्चात्ताप होऊन सोमवारी दुपारी या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Ratnagiri: The accused's suicide attempted by rape | रत्नागिरी : बलात्काराचा प्रयत्न करून आरोपीची आत्महत्या

रत्नागिरी : बलात्काराचा प्रयत्न करून आरोपीची आत्महत्या

ठळक मुद्देबलात्काराचा प्रयत्न करून आरोपीची आत्महत्यागुहागर पोलीस ठाण्यात नोंद

गुहागर : तालुक्यातील असोरे- गोंधळेवाडी येथील प्रशांत वसंत गोंधळी (३५) याने ३० वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्याने तिच्यावर हल्ला केला. मात्र, या सर्व घटनेनंतर पश्चात्ताप होऊन सोमवारी दुपारी या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रशांत गोंधळी व विवाहिता दोघेही एकाच वाडीमध्ये राहतात. गोंधळी हा या विवाहितेवर पाळत ठेवून होता. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता घरी कोणी नसल्याचा फायदा घेत या विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने प्रतिकार केल्याने चाकूने तिच्या पोटावर व हातावर वार केले. मात्र, यानंतर युवकाने घाबरुन पळ काढला.

या महिलेने सोमवारी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणामुळे घाबरुन गेलेल्या प्रशांत गोंधळी याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरा याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

Web Title: Ratnagiri: The accused's suicide attempted by rape