शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

रत्नागिरी : आंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 4:46 PM

पोलादपूर महाबळेश्वरच्या प्रवास दरम्यान येणारा आंबेनळी घाटात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दरीत कोसळलेली दुर्घटनाग्रस्त बस येत्या 6 आक्टोंबर  रोजी बाहेर काढण्यात येणार आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळणची शक्यता आहे.

ठळक मुद्देआंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढली जाणारअपघातग्रस्त बस दापोली कोकण कृषी विद्यापीठाची

दापोली (रत्नागिरी) : पोलादपूर महाबळेश्वरच्या प्रवास दरम्यान येणारा आंबेनळी घाटात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दरीत कोसळलेली दुर्घटनाग्रस्त बस येत्या 6 आक्टोंबर  रोजी बाहेर काढण्यात येणार आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळणची शक्यता आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या एकुण 30 कर्मचा-यांचा या अपघातामध्ये  मृत्यू झाला होता. महाराष्ट्रच नव्हे तर देश या घटनेने हादरला होता. मात्र हा अपघात नेमका कशामुळे घडला याचे अद्याप कारण समजु शकलेले नाही. या अपघातग्रस्त बसची तपासणी केल्यावर कदाचित अपघाताचे तांत्रिक कारण समजण्याची शक्यता आहे. यावेळी तांत्रिक कारण समजण्याबरोबरच स्टेअरिंगवरील हाताचे ठसे मिळतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.एम एच 08 ई 9087 या क्रमांकाची ही 30 आसनी बस होती. या बस मधील ३१ कर्मचारी हे  राहुरीला महाबळेश्वर मार्गे चालले होते. हि गाडी रोहा येथुन या प्रवासासाठी मागविण्यात आली होती. 28 जुलै रोजी सकाळी 6.55 वाजता मध्यवर्ती कार्यशाळेच्या आवारातुन सुटली होती. त्यानंतर पोलादपूर महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात 11 ते 11.30 च्या दरम्यान हा दुर्देवी अपघात घडला होता. या अपघातात बस सुमारे तब्बल १२००  फूट दरीत कोसळली होती.या अपघातात एकमेव प्रकाश सावंत झ्र देसाई हा कर्मचारी बचावला आहे. सावंत झ्र देसाई यांनी विद्यापीठाच्या चौकशी समितीपुढे दिलेल्या जबाबानुसार बसमधील वाहनचालक दोन वेळा बदली करण्यात आले. बस चांगल्या स्थितीत होती. सदर अपघातावेळी प्रशांत भांबिड हे मुख्य वाहन चालक हे बस चालवत होते. गाडी प्रवासा दरम्यान मातीच्या ढिगा-यावरून डावीकडुन खाली घसरून हा अपघात झाल्याचे सावंत देसाई यांनी चौकशी समितीसमोर सांगितले आहे.

असे असले तरी बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावर दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह हर्णे पाजपंढरी येथील मृतांचे नातेवाईक पी.एन.चोगले यांनी संशय व्यक्त करणारे निवेदन शासनाकडे दिले आहे. कोळी महासंघाकडुनही याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र अद्याप प्रकाश सावंत देसाई यांच्याविरोधातील कोणताही पुरावा सुरक्षायंत्रणेला मिळालेला नाही. त्यामुळे आता बसच्या स्टेअरिंगवर हातांचे ठसे मिळाल्यास यावरूनचे नेमके अपघातप्रसंगी कोण गाडी चालवत होते याची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र असे ठसे आता तब्बल दोन महिन्यानंतर स्टेअरिंगवर मिळतात का याकडे अनेकांचे लक्ष लागुन राहिले आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिसDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायत