रत्नागिरी : लांजात पंधरा वर्षीय मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:29 IST2018-10-31T12:26:42+5:302018-10-31T12:29:22+5:30

नववीन शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना लांजा तालुक्यातील गवाणे येथे आज बुधवारी उघड झाली आहे. जयेश दिनेश कांबळे असे त्याचे नाव आहे.

Ratnagiri: A 15-year-old child commits suicide | रत्नागिरी : लांजात पंधरा वर्षीय मुलाची आत्महत्या

रत्नागिरी : लांजात पंधरा वर्षीय मुलाची आत्महत्या

ठळक मुद्देलांजात पंधरा वर्षीय मुलाची आत्महत्याआत्महत्याचे कारण अजून समजलेले नाही

लांजा : नववीन शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना लांजा तालुक्यातील गवाणे येथे आज बुधवारी उघड झाली आहे. जयेश दिनेश कांबळे असे त्याचे नाव आहे.

लांजा हायस्कूलमध्ये नववीमध्ये शिकणारा जयेश कांबळे (गवाणे) मंगळवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेला. सध्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. पेपर दिल्यानंतर सायंकाळी ४.४५ वाजता तो लांजा - शिरगाव गाडीने गवाणे फाटा येथे उतरला. मात्र तो घरी गेला नाही.

रात्रभर त्याचा शोध सुरू होता. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गावातच एका झाडाला त्याने दोरीने गळफास लावून घेतले असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या आत्महत्याचे कारण अजून समजलेले नाही.

Web Title: Ratnagiri: A 15-year-old child commits suicide