शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत तिसऱ्या दिवशीही धुवाधार

By admin | Updated: June 29, 2016 00:05 IST

लांजात युवतीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू : कसब्यात गणेश मंदिरावर वडाचे झाड कोसळले

रत्नागिरी : सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात दाणादाण उडवणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ७५१.२६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. लांजात वैभव वसाहत येथे एक युवती विजेच्या धक्क्याने मृत झाली असून, संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे गणेश मंदिरावर वडाचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील आसूद येथील चार घरांना पावसामुळे धोका निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे जागोजागी पाणी भरल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी सायंकाळी पावसाने काही वेळ विश्रांती घेतली होती. सोमवारी रात्री पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली. मंगळवारी दिवसभर पावसाचा हा वेग कायम होता. लांजा वैभव वसाहत येथे पाऊस असल्याने प्रणिता महादेव भोसले (वय १९) ही युवती घराच्या पायऱ्यांवर कपडे धूत होती. त्यानंतर दरवाजा ढकलून ती घरात जात असतानाच विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे ती जागीच ठार झाली.संगमेश्वरातही पावसाचा जोर मंगळवारी कायम होता. तालुक्यातील कसबा येथील गणेश मंदिरावर गेले दोन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास वडाचे मोठे झाड पडून मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून, आसूद येथील चार घरांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे. तहसीलदार कविता जाधव यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून या कुटुंबांना स्थलांतरित होण्याची सूचना केली आहे. चिपळुणात मुसळधार पावसामुळे नगर परिषदेच्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली, तर कात्रोळी येथे सोमवारी एका घराची भिंत कोसळली. दरम्यान, तालुक्यातील वीर देवपाट येथील दरडग्रस्त भागाची तहसीलदार जीवन देसाई व उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांनी पाहणी केली.मंडणगड, राजापूर, गुहागर, आदी भागांत पावसाचा वेग त्या मानाने कमी आहे. या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असला तरीही शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेड तालुक्यातही पावसाने जोर पकडला असून, नातूनगरसह अन्य धरणे पाण्याने भरली आहेत. (प्रतिनिधी)पावसाचा वेगही वाढणारयेत्या २४ तासांसाठी हवामान खात्याने कोकणात सावधानतेचा इशारा दिला आहे. २८ जूनपासून पुढील २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात ७ ते ८ से.मी.पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर त्यापुढील २४ तासात ७ ते १२ से.मी.पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.