शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस, नदीची पातळी कळणार क्लीकवर; रत्नागिरीतील ३ नद्यांवर 'रियल टाइम डेटा सिस्टिम' कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 19:04 IST

पावसाचे प्रमाण वाढल्यास नियंत्रण कक्षामार्फत नागरिकांना सतर्क करणेदेखील आता सोपे व सहज झाले आहे. त्यामुळे नुकसानाची तीव्रता कमी करण्यास या यंत्रणेचा खूप मोठा फायदा होणार आहे.

खेड : जलसंपदा विभागामार्फत कोकणातील नद्यांवर अत्याधुनिक रियल टाइम डेटा सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नद्यांमधील पाणी पातळी, पर्जन्यमान यांच्याबाबतचे अचूक आकडे वेगवान पद्धतीने प्रशासनाला उपलब्ध होणार असून, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोकणासाठी ही यंत्रणा महत्त्वाचे काम करणार आहे.गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, चिपळूण, राजापूर या ठिकाणी नद्यांना आलेल्या महापुरामुळे मोठी जीवितहानी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभाग जल विज्ञान प्रकल्प नाशिकच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्याच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यासाठी रियल टाइम डेटा सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे.९ ठिकाणी ए.आर.एस तर ३ ठिकाणी ए.डब्ल्यू.एल.एस सिस्टिमरत्नागिरी जिल्ह्यात ९ ठिकाणी ए. आर. एस  म्हणजेच ॲटोमॅटिक रेन सोर्स स्टेशन आणि तीन ठिकाणी ए डब्ल्यू  एल एस म्हणजेच ॲटोमॅटिक वॉटर लेव्हल रेकॉर्ड सिस्टिम बसवण्यात आली आहे. खेडमधील जगबुडी नदी, चिपळूण येथील बहाद्दूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदी आणि राजापूर येथील अर्जुना नदी या तीन ठिकाणच्या नद्यांवर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.सतर्कतेची सूचना देणे शक्य होणारजलसंपदा विभागामार्फत एक लिंक देखील देण्यात आली असून, या लिंक वर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यातल्या तीन नद्यांच्या पाण्याची पातळी आणि नऊ ठिकाणच्या पावसाच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात बसवण्यात आलेल्या या यंत्रणेचा वापर अत्यंत आवश्यक असून, या यंत्रणेमुळे नद्यांची पातळी वाढल्यास नदीच्या आसपासच्या गावांना तत्काळ सतर्कतेची सूचना देणे शक्य होणार आहे. एवढेच नाही तर पावसाचे प्रमाण वाढल्यास नियंत्रण कक्षामार्फत नागरिकांना सतर्क करणेदेखील आता सोपे व सहज झाले आहे. त्यामुळे नुकसानाची तीव्रता कमी करण्यास या यंत्रणेचा खूप मोठा फायदा होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfloodपूरriverनदीWaterपाणी