दापोली : विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील एका सहयोगी प्राध्यापकाची सहायक प्राध्यापक अशी पदानवती करून त्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.दापोली कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने याच महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापकाविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार १८ जुलै २०२५ रोजी कुलगुरूंकडे केली होती. विद्यापीठ प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत या सहयोगी प्राध्यापकाला सेवेतून निलंबित करून या तक्रारीची चौकशी करण्यासाठी ६ ऑगस्ट २०२५ रोजी एक त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून नुकताच आपला अहवाल विद्यापीठ प्रशासनाला सादर केला आहे. या अहवालात या सहयोगी प्राध्यापकाने आपल्या पदाचा, अधिकाराचा व शिक्षक विद्यार्थी या पवित्र नात्याचा गंभीर गैरवापर करणारे व नैतिक अध:पतन दर्शविणारे, कायदा व सेवा नियमांचे स्पष्ट उल्लंघन करणारे व शासकीय सेवेस अशोभनीय ठरेल असे कृत्य केले असल्याचे म्हटले आहे.या अहवालाच्या आधारे या सहयोगी प्राध्यापकाला सहायक प्राध्यापक अशी पदानवती देण्यात आली असून, त्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. या प्राध्यापकाची दोन वर्षे सेवा शिल्लक आहे.
Web Summary : A professor at Dapoli Agricultural College was demoted and transferred to Sindhudurg after a student accused him of sexual harassment. An inquiry found him guilty of misusing his position and violating service rules.
Web Summary : दापोली कृषि महाविद्यालय के एक प्रोफेसर को छात्रा द्वारा यौन उत्पीड़न के आरोप के बाद पदावनत कर सिंधुदुर्ग स्थानांतरित कर दिया गया। जांच में उन्हें पद का दुरुपयोग करने और सेवा नियमों का उल्लंघन करने का दोषी पाया गया।