शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वंकष मूल्यमापनाव्दारे विद्यार्थ्यांचा निकाल देण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:26 IST

रत्नागिरी : शिक्षण विभागाच्या नियमानुसार वर्षभर विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात येते. त्यामध्ये विद्यार्थ्याची मानसिकता, ...

रत्नागिरी : शिक्षण विभागाच्या नियमानुसार वर्षभर विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात येते. त्यामध्ये विद्यार्थ्याची मानसिकता, कल, रूची, आवड, आकलन, विषयातील ज्ञान, आदी गोष्टी विचारात घेतल्या जातात. त्यामध्ये टक्केवारी न ठरवता अ, ब, क अशी श्रेणी निश्चित केली जाते. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही वार्षिक परीक्षा रद्द केल्यामुळे सर्वकष मूल्यमापन पध्दत स्वीकारून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळांचे शिक्षक सरसावले असून, काही शाळांनी दि. १० पर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.

लॉकडाऊनमुळे शाळांमधील अध्यापन तर बंदच शिवाय अन्य शिक्षण संस्थांचे कामकाजही थांबले होते. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचे पूर्वीचे मूल्यमापन करून गुणपत्रिका बनविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांमध्ये गुणपत्रिका तयार करण्याची कामे सुरू आहेत.

वार्षिक परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्या. स्थानिक पातळीवर शिक्षण समितीतर्फे बोर्डाच्या वगळता अन्य वर्गाच्या परीक्षा घेण्यात येतात. पूर्व नियोजनानुसार सहामाही परीक्षा पार पडली. परंतु वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले. शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना मागील परीक्षांचे मूल्यमापन करून गुण देण्याचे निश्चित केले आहे. शाळांनी गुणपत्रिकेचे काम हाती घेऊन, ऑनलाइन गुणपत्रिका वितरीत कराव्यात, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याने गुणपत्रिकेच्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. सलग दोन वर्षे वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आली असून, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनावर आधारित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा श्रेणीनिहाय निकाल व गुणपत्रिका दि. १० मे पर्यंत देण्याच्या सूचना प्रशासनाकडून सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांमधून निकालपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून निकालासाठी शाळेत गर्दी होऊ नये यासाठी वर्गनिहाय तारखा निश्चित करून पालकांना वेळापत्रक व्हॉट‌्सअपवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे दि.१० मे पर्यंत सर्व वर्गातील मुलांचे परीक्षा न देताच निकालपत्र हाती मिळण्याची शक्यता आहे.