शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कॉँग्रेस बदलणार प्रदेशाध्यक्ष !

By admin | Updated: June 18, 2014 00:55 IST

भास्कर जाधव यांच्या जागी नवा चेहरा शक्य

मुंबई : विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महत्त्वाचे बदल केले जातील, असे संकेत आहेत. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या जागी गृहमंत्री आर. आर. पाटील, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना आणले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार गेले महिनाभर मुंबईत तळ ठोकून आहेत. या काळात ते किमान सात ते आठ हजार पक्ष कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांना व्यक्तिश: भेटले. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हानिहाय बैठका घेतल्या. प्रदेशाध्यक्षपदी प्रभावी वक्तृत्व असलेल्या नेत्याची निवड करावी, जेणेकरून प्रचारामध्ये भाजप-शिवसेनेला जशाच तसे उत्तर देता येईल, असे मत पवार यांच्यासमोर अनेकांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर, अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली जाऊ शकते. वर्षभरापूर्वी जाधव यांची प्रदेशाध्यक्षपदी, तर जितेंद्र आव्हाड यांची कार्याध्यक्षपद नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीच्या घड्याळाला दोन नवे काटे लावूनही लोकसभा निवडणुकीत काही फायदा झाला नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून जाधव यांची कामगिरी निष्प्रभ ठरली. त्यामुळे त्यांच्या जागी अनुभवी नेत्याची निवड केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)