कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर
By अरुण आडिवरेकर | Updated: January 25, 2025 19:04 IST2025-01-25T19:04:07+5:302025-01-25T19:04:29+5:30
रत्नागिरी : कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय भास्कर दराडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपती द्राैपदी ...

कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर
रत्नागिरी : कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय भास्कर दराडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी शनिवारी याची घाेषणा केली असून, प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
संजय दराडे यांनी कोकण विभागाचे सूत्र हाती घेतल्यानंतर कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पोलिस स्थानकाला भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेबाबत सूचना केल्या हाेत्या. विशेषतः महिलांवरील अत्याचार महिलांबाबत असलेल्या तक्रारी याबाबत २४ तासाच्या आत संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात अनेक काही हत्या प्रकरण घडली आहेत. या प्रकरणांचा छडा लावण्यात संजय दराडे यांनी मोठी भूमिका बजावली आहे.
नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक असताना त्यांनी उत्तर प्रदेशातून येणाऱ्या बंदुकीसारखा अवैधरित्या शस्त्रसाठा जप्त करून तब्बल ४४ बंदूक व ४ हजार काडतुसे पकडून आठ जणांची आंतरराज्य टोळी जेरबंद केली होती. त्यांनी धाराशिव, यवतमाळ आणि नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे अधीक्षक म्हणून काम केले आहे.
कोकण परिक्षेत्रात जिल्हा पोलिस स्थानकात अद्यावत सोशल लॅब सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच सोशल सायबर क्राईममध्ये सोशल लॅब अॅक्टिव्ह होणार आहे.
२००५ साली भारतीय पोलिस सेवेतील ते आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे नाशिक येथील असून, पुणे येथील इंजिनिअरिंग महाविद्यालयामधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. काही काळ ते लाेटे (ता. खेड) येथील घरडा केमिकल कंपनीत कार्यरतही हाेते.
२०१५ मध्ये नाशिक कुंभमेळा बंदोबस्त यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना कौतुक पत्र दिले हाेते. त्यांनी पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून पूर्व मुंबईत प्रभावीपणे काम केले हाेते. २०२४ची लोकसभा निवडणूक त्यांनी राजकीयदृष्ट्या संवेदनशील कोकण परिक्षेत्रात यशस्वीपणे हाताळली. त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.