शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कांदळवन क्षेत्र नोंदीचा अहवाल सादर

By admin | Updated: March 18, 2015 23:59 IST

गुहागर तालुका : लवकरच होणार सातबारा उताऱ्यावर नोंद

गुहागर : गुहागर तालुक्यात १४ गावांमधील १४८ हेक्टर कांदळवन क्षेत्र संरक्षित असून याची शासकीय सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी अधिसूचनेसाठीचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.याबाबत प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी गुहागरमधील कांदळवन क्षेत्राच्या भूमी अभिलेख खात्याच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यामध्ये सातबाऱ्यावरील प्रत्यक्ष क्षेत्र व त्यामधील कांदळवन क्षेत्र त्याची दिशा अशा अनेक बाबींबाबत राहिलेल्या त्रूटी दूर करण्याचे काम गेली अनेक दिवस चालू होते.महसूल खात्याकडून अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम अधिसूचनेसाठी पाठवण्यात आला आहे. यामध्ये शासनाच्या ताब्यात असलेल्या हद्दीमधील १४८ हेक्टर क्षेत्र प्रत्र्यक्ष सातबाऱ्यावरती नोंद करुन वनखात्याच्या ताब्यात दिले जाणार आहे. यापूर्वी राहिलेल्या त्रुटी दूर करुन या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलेल्या कांदळवन क्षेत्राचे सातबाऱ्यावरती नोंद करुन वनविभागाकडे याचा ताबा देण्यासाठीची ही प्रक्रिया असून यावरती गेली वर्षभर काम सुरु आहे. महाराष्ट्र रिमोंट सेन्सीज अ‍ॅप्लीकेशन सेंटर नागपूर यांच्याकडून सॅटेलाईटद्वारे घेतलेला नकाशा व एरीया स्टेटमेंट भूमी अभिलेख खात्याकडे देण्यात आले होते. घरटवाडी, तवसाळ व अन्य काही गावांचे कांदळवन क्षेत्र तब्बल काही शेकड्यांनी चूकभुलीने वाढवल्याने गुहागर तालुक्यात १७०० हेक्टर कांदळवन क्षेत्राची चुकीची नोंद करण्यात आली होती. यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर याबाबत कमी जास्त पत्रके करुन या क्षेत्राला नवीन सर्व्हे नंबर व गट नंबर देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितले की, १४ गावांमधील आतील १४८ हेक्टर क्षेत्र आहे. याबाबत सध्या कार्यवाही चालू आहे. तसेच शासनाच्या ताब्यात नसलेली बाहेरील १९ गावांमधील १०३ हेक्टर कांदळवन क्षेत्र आहे. याबाबत अद्याप कोणतेही शासाकडून निर्देश आलेले नाहीत. भविष्यात हे क्षेत्रही शासन ताब्यात घेईल अशी शक्यता आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून अंतिम अधिसूचना जाहीर झाल्यानंतर काही हरकती असल्यास त्या स्वीकारुन त्यावर विचार होणार आहे. (प्रतिनिधी)समुद्राचे अतिक्रमण थोपवण्याबरोबरच माशांना प्रजननासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून कांदळवन क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. किनाऱ्याजवळच प्रजनन झाले तर पुढच्या काळात मासळी चांगल्या प्रमाणात मिळते. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याचे गांभीर्य लक्षात घेवून याबाबतचे आदेश शासनस्तरावर दिले आहेत.