शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

दक्षिण आफ्रिकेमधील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या त्रिमूर्तींचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:44 IST

रत्नागिरी व कोकणातील क्रीडाक्षेत्राला नवा आयाम

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील धामापूरचे सुपुत्र प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणचे डॉ. तेजानंद गणपत्ये व मूळचे खेडमधील सध्या ठाणेस्थित सुरेश वेलणकर यांनी दक्षिण आफ्रिकेमधील जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेतील पिटर्समारीबर्ग ते डर्बन हे सुमारे ९० किलोमीटरचे अंतर ११ तास ३० मिनिटांत पूर्ण करत कोकणचा झेंडा उंचावला. या यशाने रत्नागिरी व कोकणातील क्रीडाक्षेत्रात नवा इतिहास घडविला आहे.कॉम्रेड्स मॅरेथॉन ही जगातील सर्वांत जुनी आणि प्रतिष्ठेची अल्ट्रा मॅरेथॉन मानली जाते. या वर्षी स्पर्धेचे ९८वे वर्ष होते. पिटर्समारीबर्ग ते डर्बन हे सुमारे ९० किलोमीटरचे अंतर १२ तासांत पूर्ण करणे हे मोठे आव्हान होते. तापमानात ५ ते २२ अंश सेल्सिअस इतका फरक, चढउतार आणि अनेक अडथळ्यांचा सामना करत प्रसाद देवस्थळी (११ तास, ३८ मिनिटे, ४९ सेकंद) आणि डॉ. गणपत्ये (११ तास, २४ मिनिटे, ४१ सेकंद) तसेच वेलणकर (९ तास, ४१ मिनिटे, ०८ सेकंद) यांनी वेळेत स्पर्धा पूर्ण करून पदक मिळविले.गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजक प्रसाद देवस्थळी सक्रिय धावपटू असून, देशभरातील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतात. कॉम्रेड्स मॅरेथॉन ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन होती. वैयक्तिक कामगिरी हा विषय नव्हता; पण अर्थातच मोठी मॅरेथॉन पूर्ण केल्याचे समाधान आहे. वैयक्तिक कामगिरीपेक्षा कोकणवासीयांना ही मोठी स्पर्धा कशी असते, हे समजावे यासाठी हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया देवस्थळी यांनी दिली. १३ जून रोजी त्यांचे आगमन रत्नागिरीत होणाऱ्या नागरी सत्कारासह जंगी स्वागत होणार आहे.सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, गणपतीपुळे अल्ट्रामॅरेथॉन टीम आणि शेकडो धावपटूंनी त्यांच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे.कोकणातील दुसरे यशस्वी सायकल व धावपटूचिपळूणचे डॉ. गणपत्ये हे या शर्यतीत सहभागी झालेले कोकणातील दुसरे यशस्वी सायकल व धावपटू आहेत. त्यांनी याआधी लोहपुरुष किताब आणि सायकलिंगमध्ये एस. आर. किताब मिळवले आहेत. शेवटच्या ३० किलोमीटरमध्ये टाकलेले प्रत्येक पाऊल हे सहनशक्तीची परीक्षा घेणारे होते. प्रसाद आणि आपण ही स्पर्धा पूर्ण करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले धावपटू ठरलो, याबद्दल आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.