शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

भातगाव कोसबी शाळेच्या ह्यरिंग द बेल फॉर वॉटर उपक्रमाचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:17 IST

दिवसभर मुले पुरेसे पाणी पित नसल्याने जिल्हा परिषद शाळा भातगाव कोसबीमध्ये ह्यरिंग द बेल फॉर वॉटरह्ण या नाविन्यपूर्ण उपक्रमातून मुलांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. मुलांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विशेषकरून पालकही मुलांच्या पाणी पिण्यामुळे खूश झाले आहेत.

ठळक मुद्देपहिली बेल सकाळी अकरा वाजता दिली जाते त्यानंतर बारा, एक, तीन, चार वाजता याप्रमाणे दिवसातून पाच वेळा बेल देण्यात येत आहे.

रत्नागिरी : शाळेच्या दैनंदिन वेळापत्रकात मधल्या वेळची जेवणाची सुटीवगळता सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रात दोन सुट्या होतात. त्यासाठी घंटा अथवा बेल वाजविली जाते. मात्र, नियमित शाळा भरण्याच्या, सुटण्याच्या वेळा, जेवणाची सुटी, व दोन सत्रातील दोन छोट्या सुट्यांसाठी बेल वाजवित असताना आता नवीन बेल सुरू करण्यात आली आहे. ही बेल वाजताच विद्यार्थी आपापल्या पाण्याच्या बाटल्या काढून त्यातील पाणी पित आहेत. भातगाव-कोसबी शाळेमध्ये ह्यरिंग द बेल फॉर वॉटरह्ण हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

दिवसभर मुले पुरेसे पाणी पित नसल्याने जिल्हा परिषद शाळा भातगाव कोसबीमध्ये ह्यरिंग द बेल फॉर वॉटर या नाविन्यपूर्ण उपक्रमातून मुलांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. मुलांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विशेषकरून पालकही मुलांच्या पाणी पिण्यामुळे खूश झाले आहेत.

दिवसात किमान दोन ते तीन लीटर पाणी शरीराला आवश्यक आहे. मात्र, मुले एवढे पाणी पित नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन कोसबी शाळेच्या शिक्षकांनी पाणी पिण्यासाठी बेल वाजविण्याचा निर्णय घेतला, शिवाय अंमलबजावणीही सुरू केली आहे. पाणी पिण्यासाठी बेल देण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली होती, त्यानंतर दिवसातून ठराविक वेळी बेल वाजविली जाते. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना दोन मिनिटे पाणी पिण्यासाठी वेळ दिला जातो. सर्व विद्यार्थी एकाच वेळी जेवढी तहान असेल तेवढे पाणी पितात. पहिली बेल सकाळी अकरा वाजता दिली जाते त्यानंतर बारा, एक, तीन, चार वाजता याप्रमाणे दिवसातून पाच वेळा बेल देण्यात येत आहे.

आरोग्य विज्ञानानुसार पाणी नियमितपणे प्यायल्याने मूत्रावाटे क्षार बाहेर टाकले जातात. त्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता कमी असते. आपल्या शरीरात ६0 टक्के पाणी असते. लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील विषारी पदार्थांचे विसर्जन या सर्व क्रिया पाण्यावर अवलंबून आहेत. विद्यार्थ्यांमध्ये जलजागृती व्हावी, विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी हा उपक्रम मुख्याध्यापक संतोष रावणंग व सहकारी शिक्षक शाळेमध्ये राबवित असून, या उपक्रमाचे ग्रामस्थांकडूनही विशेष कौतुक होत आहे.

चळवळ व्हावी
बदलत्या तापमानामुळे उष्मा आता तीव्रपणे जाणवू लागला आहे. अशा दिवसात कमी पाण्यामुळे मुलांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यावर ह्यपाण्यासाठी घंटाह्ण अशा माध्यमातून शाळांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. ह्यपाण्यासाठी घंटाह्ण हा केवळ उपक्रम न राहता एक चळवळ म्हणून सर्वत्र पसरण्याची गरज आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळाWaterपाणी