राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू, खेडमध्ये आजी-माजी आमदार द्वयींमध्येच लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 02:20 PM2020-12-26T14:20:58+5:302020-12-26T14:22:50+5:30

gram panchayat Elecation Ratnagiri-खेड तालुक्यातील दापोली विधानसभा मतदार संघात येणार्‍या ४३ व गुहागर विधानसभा मतदार संघात येणार्‍या ४४ अशा एकूण ८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ लाख २१ हजार ४३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

Political parties start forming fronts, fighting in Khed between grandparents and former MLAs | राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू, खेडमध्ये आजी-माजी आमदार द्वयींमध्येच लढाई

राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू, खेडमध्ये आजी-माजी आमदार द्वयींमध्येच लढाई

Next
ठळक मुद्देराजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू खेडमध्ये आजी-माजी आमदार द्वयींमध्येच लढाई

दापोली/खेड : तालुक्यातील दापोली विधानसभा मतदार संघात येणार्‍या ४३ व गुहागर विधानसभा मतदार संघात येणार्‍या ४४ अशा एकूण ८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ लाख २१ हजार ४३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुका होणार्‍या ८७ ग्रामपंचायतींपैकी सार्वत्रिक १५ सदस्यीय व ६२३९ मतदार असलेली भरणे ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत ठरणार आहे. त्यानंतर ११ सदस्य संख्या व ४००३ मतदार असलेल्या लोटे ग्रामपंचायतीचा नंबर लागतो. निवडणुका होणार्‍या ग्रामपंचायती दापोली व गुहागर या दोन्ही विधानसभा मतदार संघातील असल्याने या ग्रामपंचायती पक्षीय दृष्ट्या आपल्याकडे राहण्यासाठी दापोलीचे आमदार योगेश कदम व गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव हे जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनीही वर्चस्व पणाला लावले आहे. राज्याच्या राजकारणात तीन पक्षांची महाविकास आघाडी तयार होऊन महाआघाडीची सत्ता आहे. मात्र, ही महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थाचे मूळ समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायतीमध्ये अबाधित राहणार का, या प्रश्नाचे उत्तर काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितीत शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, भाजप व कॉग्रेस स्वबळावरच आपले उमेदवार उभे करणार असल्याचे चित्र आहे.

माजी आमदार संजय कदम दापोली विधानसभा मतदार संघात पराभूत झाले असले तरी तळागाळातील मतदारांशी ते कायम संपर्क ठेवून आहेत. मतदार संघातील विकासकामासाठी वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून प्रयत्नशील आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर गेले वर्षभर आपला प्रभाव मतदार संघात पुन्हा प्रस्थापित करीत असल्याचे दिसून येत आहे.

आमदार योगेश कदम यांनीही आपल्या मतदार संघातील युवा शक्तीला एकत्र करून त्यांना प्रवाहात आण्याचे काम केले आहे. २०१६ पासून सक्रिय झाल्यापासून त्यांनी नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचा संघटनेत चांगला मेळ घातला आहे. त्याचबरोबर त्यांनी गेल्या चार वर्षात विविध विकास कामांचा धडाका लावला आहे.

उमेदवारांसाठी चाचपणी
निवडणुका जाहीर झाल्यानंतर मनसे आणि भाजपने स्वतंत्र उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली आहे. तरी काही ठिकाणी मनसे आणि भाजपने आपले उमेदवारही निश्‍चित केले आहेत. या दोन्ही मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजप व कॉग्रेसचे अस्तित्व नावापुरतेच दिसत असले तरी काही ठिकाणी दोन्ही पक्षांच्या विजयात अडथळा ठरू शकतील एवढी शक्ती या उमेदवारांमध्ये नक्कीच आहे.

मतदार टिकवणे कसोटी
लॉकडाऊन, निसर्ग चक्रीवादळ या काळात संजय कदम यांनी मतदार संघातील प्रत्येकाला मदत केली आहे. त्यामुळे राज्यात सत्ता जरी महाविकास आघाडीची असली तरी निवडणुकीच्या निमित्ताने आजी-माजी आमदार द्वयींमध्येच खरा राजकीय सामना आहे. दोन्हीही पक्षांना आपले मतदार टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. यातच मनसे व भाजपची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे.

Web Title: Political parties start forming fronts, fighting in Khed between grandparents and former MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.