शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

लोटणकरांना न्याय मिळवून देण्यास पोलीसच असमर्थ

By admin | Updated: July 2, 2015 22:44 IST

वाळीत प्रकरण : पूजेचे अधिकार जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार

रत्नागिरी : गावातील मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या वृद्ध गावकऱ्याकडून जबरदस्तीने पूजेचे अधिकार काढून घेऊन त्याला आणि त्याच्या पत्नीला वाळीत टाकण्याचा प्रकार परटवली गावकरीवाडी (ता. राजापूर) येथे गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. याबाबत या दाम्पत्याने रायपाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही पोलीस या दाम्पत्याला न्याय मिळवून देण्यास असमर्थता दर्शवत आहेत.परटवली येथील गंगो देवाच्या मंदिरात देवाला नारळ ठेवणे, प्रसाद लावणे हे काम गावकरवाडी येथील श्रीधर लोटणकर हे अनेक वर्षांपासून पाहात आहेत. ६५ वर्षीय श्रीधर लोटणकर सध्या अर्धांगवायूने आजारी आहेत. त्यांचा मुलगा संतोष पत्नीसह नोकरीनिमित्त मुंबईला असतो, तर दोन मुली विवाहित आहेत. आजारपणामुळे देवळाचे काम होत नसल्याने २००७ साली गावाने बैठक घेऊन लोटणकर यांना नारळ ठेवून बाजुला होण्यास सांगितले. लोटणकर यांनी देवळाचे काम सोडण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यांनी नारळ ठेवून देण्यास नकार दर्शविला. त्यामुळे श्रीधर लोटणकर व त्यांची पत्नी शारदा यांच्यावर वाडीने बहिष्कार टाकला आहे. या प्रकारात त्यांचा पुतण्या दीपक लोटणकर हा मुख्य सूत्रधार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दीपक लोटणकर याच्याकडून या वृध्द दाम्पत्याला शिवीगाळ करणे, धमकावणे, अंगावर धावून जाणे असे दडपशाहीचे प्रकार सुरू होते. आपण शिवसेनेचे कार्यकर्ता आहोत. या कुटुंबाशी संबंध ठेवाल तर तुमच्या घरीही धार्मिक कार्य होऊ देणार नाही, अशी धमकी तो गावातल्या लोकांनाही देत असल्याने आता पूर्ण भावकीनेच भीतीने या कुटुंबाला दूर ठेवले आहे. गावातील पाणी योजनेपासून श्रीधर लोटणकर यांच्या कुटुंबियांना दूर ठेवले जात आहे. अशा अनेक गैरसोयींना या कुटुंबाला सामोरे जावे लागत आहे.याबाबत लोटणकर यांनी गावच्या तंटामुक्त समितीकडेही आपली कैफियत मांडली. मात्र, हा तुमचा घरगुती मामला आहे, तो तुम्हीच सोडवा, असे सांगण्यात आले. दीपक लोटणकर याच्या धमकीमुळे भयभीत झालेल्या श्रीधर लोटणकर यांच्या पत्नीने ४ जूनला रायपाटण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. यावेळी सरपंचांसह इतरांनीही लोटणकर कुटुंबियांना कुठे जायचे ते जा. आमचे कुणी वाकडे करू शकत नाही, असे सांगितले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी ६ जून रोजी श्रीधर लोटणकर यांची पत्नी तसेच वाडीतील इतरांना बोलावून समज दिली. यावेळी पाण्यासाठी बंदी करता येणार नाही, असे सांगून या योजनेच्या पाईपलाईनसाठी जो खर्च असेल तो लोटणकर यांना सांगा, असेही सांगितले. मात्र, त्यानंतर पोलीस पाटील यांनी पाईपलाईन देण्यास वाडीतील लोकांचा विरोध असल्याचे सांगितले. यानंतर १६ रोजी लोटणकर यांच्या पत्नीने ओटवणेकर यांच्या कानावर ही बाब घातली. मात्र, ही तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे करा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता तंटामुक्त समिती, पोलीस यंत्रणा न्याय द्यायला असमर्थ असल्याने याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी श्रीधर लोटणकर यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)श्रीधर लोटणकर आणि त्यांचे कुटुंबीय तसेच परटवली गावकरवाडीतील लोकांना एकत्र बोलावून याबाबत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून, लोटणकर यांना त्रास देणाऱ्या लोकांना समज देण्यात आलेली आहे. लोटणकर यांच्या पाण्याचा प्रश्न आहे. पण त्यांना पाण्यावर बंदी आणलीत तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले आहे. पण लोटणकर म्हणतात तसे या मंडळीवर वाडीचा बहिष्कार वगैरे काहीही नाही. - एस. एस. ओटवणेकर, सहायक पोलीस निरीक्षक, रायपाटण