गुहागरमध्ये जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 14:11 IST2020-09-01T14:01:00+5:302020-09-01T14:11:07+5:30

गुहागरमधील मुंढर येथे शिरबार वाडीतील मंगेश गांधी यांच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर गुहागर पोलिसांनी छापा टाकत सहाजणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

Police raid gambling den in Guhagar | गुहागरमध्ये जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

गुहागरमध्ये जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

ठळक मुद्देगुहागरमध्ये जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा६ जणांवर गुन्हा दाखल,दोघांना अभय?

गुहागर : गुहागरमधील मुंढर येथे शिरबार वाडीतील मंगेश गांधी यांच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर गुहागर पोलिसांनी छापा टाकत सहाजणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता ही कारवाई करण्यात आली.

कोरोना काळात देखील मंगेश गांधी यांच्या येथे अवैधरित्या ५२ पत्त्यांचा खेळ सुरू असल्याची माहिती गुहागर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. या कारवाईत ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गाड्यांचा देखील समावेश आहे.

पोलिसांनी संजय ठसाळे (चिपळूण), लवेश विचारे (चिपळूण -पाग), देवेंद्र महाजन (चिपळूण- खेंड), शैलेश पावसकर (गुहागर - कारूळ), संदीप कदम (गुहागर - चिखली, बौद्धवाडी), बाबू राठोड (चिपळूण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईतून एका निवृत्त पोलीस कर्मचारी आणि एका मोठ्या व्यावसायिकाला अभय देण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नलावडे करत आहेत.

Web Title: Police raid gambling den in Guhagar