Ratnagiri: राकेश जंगम खूनप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:24 IST2025-09-22T16:23:31+5:302025-09-22T16:24:36+5:30

खून करून मृतदेह आंबा घाटात फेकून देण्यात आला हाेता

Police constable suspended in Rakesh Jangam murder case | Ratnagiri: राकेश जंगम खूनप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

Ratnagiri: राकेश जंगम खूनप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील खून प्रकरणात जयगड पोलिस स्थानकातील हवालदार सोनावणे याला निलंबित करण्यात आले आहे, तर या प्रकरणातील आणखी एका पोलिस हवालदारांची चौकशी सुरू असून, त्याच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

राकेश जंगम बेपत्ता झाल्याप्रकरणी त्याच्या नातेवाइकांनी जयगड पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती. या प्रकरणात जयगड पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे एक वर्ष उलटूनही त्याचा शोध घेण्यात यश आलेले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भक्ती मयेकर हिच्या खूनप्रकरणी संशयित दुर्वास पाटील आणि त्याच्या साथीदारांची चौकशी करताना राकेश जंगमचा खून केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्याचा खून करून मृतदेह आंबा घाटात फेकून देण्यात आला हाेता.

राकेश जंगम याच्या बेपत्ताप्रकरणी जयगड पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील, पोलिस हवालदार सोनावणे आणि गमरे यांनी हलगर्जीपणा केल्याचा अहवाल पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे सोपवला आहे. त्याची दखल कुलदीप पाटील यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली आहे.

Web Title: Police constable suspended in Rakesh Jangam murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.