एकतर्फी प्रेमातून तरुणाचे विषप्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:34 IST2021-08-19T04:34:46+5:302021-08-19T04:34:46+5:30

रत्नागिरी : एकतर्फी प्रेमातून विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ ...

Poisoning of youth out of one-sided love | एकतर्फी प्रेमातून तरुणाचे विषप्राशन

एकतर्फी प्रेमातून तरुणाचे विषप्राशन

रत्नागिरी : एकतर्फी प्रेमातून विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ वाजण्याचा सुमारास घडली. याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रसाद एकनाथ भाटकर (२३, रा. देवरूख, सध्या रा. मिरजोळे जांभूळ फाटा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रसाद एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत नोकरीला होता. मंगळवारी रात्री प्रसादचे मित्र मंगेश भाटकर आणि समीर चव्हाण यांना तो विषारी औषध प्राशन केलेल्या अवस्थेत एका टेम्पोत सापडला. त्यांनी त्याला लगेच जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले होते. परंतु बुधवारी सकाळी १०.१५ वाजण्याचा सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हेडकॉन्स्टेबल विनोद भितळे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Poisoning of youth out of one-sided love