शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

कवी केशवसुत स्मारक भेटीत स्फुरल्या कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 6:16 PM

मराठी राजभाषा दिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेतील गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी सायकल सफर करत मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकाला भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी कवी केशवसुत यांच्या जीवनप्रवासाची माहिती करून घेतली. सुमारे अडीच तास कवी केशवसुत स्मारकात घालवताना विद्यार्थ्यांनाही कविता स्फुरल्या आणि त्या कवितांचे त्यांनी लिखाणही केले. या कवितांचे वाचन गुरूवार, २७ रोजी प्रशालेत करण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी केलेल्या कवितांचे मराठी भाषा दिनी वाचन शिर्के गुरूकुलच्या विद्यार्थ्यांची सायकल सफर

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : मराठी राजभाषा दिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेतील गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी सायकल सफर करत मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकाला भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी कवी केशवसुत यांच्या जीवनप्रवासाची माहिती करून घेतली. सुमारे अडीच तास कवी केशवसुत स्मारकात घालवताना विद्यार्थ्यांनाही कविता स्फुरल्या आणि त्या कवितांचे त्यांनी लिखाणही केले. या कवितांचे वाचन गुरूवार, २७ रोजी प्रशालेत करण्यात आले.आजच्या विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून त्यांचे शिक्षण झाले पाहिजे. यासाठीच विविध शिबिरे, व्यक्तिपरिचय, क्षेत्रभेट यासारखे उपक्रम गुरुकुलकडून सातत्याने राबविले जातात. याच संकल्पनेमधून गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत यांच्या स्मारकाला भेट दिली.

यावेळी अतिशय निसर्गरम्य वातावरणातील केशवसुतांचे जन्मघर, त्यांच्या कविता मुलांनी वाचल्या व समजून घेतल्या. आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे, याचा अनुभव यानिमित्ताने मुलांना घेता आला. विशेष म्हणजे रत्नागिरीपासून मालगुंडपर्यंत व पुन्हा रत्नागिरीपर्यंत हा संपूर्ण प्रवास मुलांनी सायकलने पूर्ण केला.गुरूकुलचे किरण सनगरे, गौरव पिलणकर, विनिता मयेकर आणि प्रियांका सुर्वे या शिक्षकांसमवेत सातवी आणि आठवीतील २६ विद्यार्थ्यांचा चमू रत्नागिरीतून सकाळी ७.३० वाजता निघाला. मालगुंड येथे ११ वाजत्या पोहोचल्यानंतर या विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्नावली दिली होती. त्या प्रश्नावलीतून विद्यार्थ्यांना निरीक्षण करण्यास सांगण्यात आले.

या प्रश्नावलीच्या अनुषंगाने त्यांचे घर, त्यांचा जीवनप्रवास, त्यांनी लिहिलेल्या कविता, त्यातून तुम्हाला आवडलेली कविता, कवितेतून काय सांगायचा प्रयत्न केला आहे हे विद्यार्थ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वजण सायंकाळी ५ वाजता पुन्हा रत्नागिरीत आले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. काहीतरी नवीन शिकायला मिळाल्याचे समाधान विद्यार्थ्यांना होते. 

रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक आहे. त्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, विद्यार्थ्यांनी कवी केशवसुतांच्या कविता वाचाव्यात, त्यांचा अभ्यास करावा, या हेतूने ही भेट आयोजित करण्यात आली होती. पुस्तकाबाहेर जाऊन मुलांनी वेगळा विचार करावा, हा यामागचा उद्देश होता.- किरण सनगरे, शिक्षक

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनRatnagiriरत्नागिरी