शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या बॅनरवर फक्त शिवसेना

By admin | Updated: June 21, 2014 00:10 IST

गीते सत्कार : अंतर्गत गटबाजी उघड

मंडणगड : लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर रत्नागिरीतील पाचही तालुक्यात वेळोवेळी झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेने महायुतीतील घटक पक्षांना योग्य तो सन्मान देण्याचे टाळले असल्याने महायुतीत बिघाडी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. खासदार अनंत गीते यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात महायुतीचा बॅनर लागला नाही. त्यावरून हा मुद्दा पुढे आला आहे. स्वागताचे सर्व कार्यक्रम एकट्या शिवसेनेने आयोजित केले. विधानसभा तोंडावर असताना घटक पक्षांची नाराजी ओढावून घेणे शिवसेनेला परवडणारे नाही. महायुतीतील घटक पक्षांना योग्य तो सन्मान द्यावा लागणार आहे. निवडणुकीत गीते यांनी निसटता का होईना, पण विजय मिळवला. दापोली मतदार संघात रामदास कदम यांचा जाहीर विरोध, संजय कदम, भास्कर जाधव या पूर्वाश्रमीच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा विरोध व शेकापचे सोडून जाणे यामुळे चार लाखांचा आकडे अबाधित ठेवणे गीतेंना कठीण जात होते. मात्र अशा परिस्थितीतही कोणतीही नाराजी ओढवणे परवडणारे नव्हते. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम केले. वारकरी संप्रदायही गीतेंच्या बाजूने उतरला व सर्वाचा परिपाक गीते यांच्या विजयात झाला. विरोधक आक्रमक आहेत, पक्षापक्षात गटबाजी वाढली आहे. या साऱ्याला तोंड देण्यासाठी महायुतीतील सर्व पक्षांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. तरीही अनंत गीते यांच्या सत्काराच्या बॅनरवर केवळ शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांची उल्लेख होते. भाजप किंवा रिपब्लिकन पदाधिकाऱ्यांना त्यासाठी विश्वासात घेण्यात आले नव्हते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला गड राखण्याचे आव्हान पेलण्यासाठी अंतर्गत नाराजी थोपवावीच लागणार आहे. कोकणात शिवसेना-भाजप हातात हात घालून सत्तेवर येऊ इच्छितात हेच यापुढे दाखविण्याचा हा खटाटोप असेल असले मत एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. (वार्ताहर)