शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

शंभर टक्के निकालाचा आनंद, मात्र प्रत्यक्ष पाहता न आल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

- शाळांना शनिवारीच निकाल पाहता येणार लोकमत नेट न्यूजवर्क रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ...

- शाळांना शनिवारीच निकाल पाहता येणार

लोकमत नेट न्यूजवर्क

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. कोकण बोर्डाचा शंभर टक्के निकाल जाहीर झाल्याचा आनंद सर्वांना झाला असला तरी बोर्डाची साईट दुपारी क्रॅश झाल्याने प्रत्यक्ष शाळांचा, विद्यार्थ्यांचा निकाल पाहता आला नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी हिरमुसले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करून अखेर घर गाठले.

कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेता आल्या नाही; मात्र, अंतर्गत मूल्यमापनानुसार निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नियोजित तारखेला, नियोजित वेळेत निकाल जाहीर केला, शंभर टक्के निकाल लागल्याचे मंडळाने घोषित केले. शाळा, विद्यार्थीनिहाय निकाल पाहण्यासाठी एकाच वेळी साईटवर असंख्य लोकांनी भेट दिल्याने साईट क्रॅश झाल्याचे मंडळातर्फे घोषित करण्यात आले. दुपारी एक वाजल्यापासून पालक, विद्यार्थी मोबाईल, संगणकाद्वारे निकाल पाहण्यासाठी उत्सुक होते. खूप वेळ प्रयत्न करूनही संकेतस्थळ सुरू होत नव्हते, अखेर मंडळातर्फे संकेतस्थळ क्रॅश झाल्याचे घोषित करण्यात आले. परंतु, सायंकाळपर्यंत संकेतस्थळ सुरू झाले नाही. त्यामुळे प्रयत्न करूनही कंटाळलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अखेर घर गाठले. दुपारपासून पालक, विद्यार्थी मात्र शाळेत फोन करून संकेतस्थळ सुरू झाले का? याबाबत वारंवार विचारणा करीत होते. मंडळाकडून सायंकाळी लवकरच संकेतस्थळ सुरू होईल असे घोषित करण्यात आल्यानंतर दिलासा प्राप्त झाला असला तरी पालक, विद्यार्थी मात्र प्रयत्नशील होते.

--------------------

अंतर्गत मूल्यमापनानुसार निकाल जाहीर करण्यात आला असला, तरी उत्सुकता मात्र होती. सकाळपासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शाळेत सर्व उपस्थित होतो. मुलांचे, पालकांचेही सातत्याने फोन येत होते. मात्र, दुपारी मंडळाचे संकेतस्थळ सुरू झाले नाही. सायंकाळपर्यंत सतत प्रयत्न करीत होतो, अखेर संकेतस्थळ सुरू न झाल्याने नाराजीने शिक्षक, कर्मचारी घरी गेले; मात्र उद्या निकाल पाहता, येईल अशी अपेक्षा आहे.

- गायत्री गुळवणी, मुख्याध्यापिका, रा. भा. शिर्के, प्रशाला, रत्नागिरी

---------------------

संकेतस्थळ सुरू होत नसल्याने मुले गोंधळली. सातत्याने प्रयत्न करून कंटाळलेल्या मुलांनी, पालकांनी अखेर शाळेत फोन करायला सुरुवात केली, कुठे, कसे पाहू अशी विचारणा करीत होती. मात्र, तांत्रिक समस्या असल्याने बोर्डाकडून त्याबाबत काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. शाळेचा, मुलांचा निकाल आता शनिवारीच पाहायला मिळणार आहे.

- प्रतापसिंह चव्हाण, मुख्याध्यापक, श्रीमान गोविंद गंगाधरभाऊ पटवर्धन स्कूल रत्नागिरी.

----------------------

कोरोनामुळे शैक्षणिक सत्राची सुरुवात ऑनलाईन झाली. दिवाळीनंतर प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या. ऑनलाईन शिक्षणाचा अनुभव नवीन होता. अभ्यास करून परीक्षा झाली नाही; मात्र मूल्यांकनानुसार पास हा ही अनुभव वेगळा असल्याने निकाल पाहण्याची उत्सुकता होती. परंतु तो आनंद संकेतस्थळ सुरू न झाल्याने घेता आला नाही.

- तनुजा पवार, विद्यार्थिनी

----------------------

निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याने संकेतस्थळावर एकाच वेळी असंख्य लोक भेट देणार हे गृहीतच होते. मात्र संकेतस्थळ क्रॅश झाले तर काय? अशा तांत्रिक समस्यांबाबतही वेळीच काळजी घेणे गरजेचे होते. कोरोनामुळे कोकण बोर्डाचा शंभर टक्के निकाल लागल्याचा आनंद झाला, मात्र पाल्याचा प्रत्यक्ष निकाल पाहण्याची जी उत्सुकता होती, तो अनुभव घेता आला नाही.

- रोहित सावंत, पालक