रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याच्या चाैथ्या दिवशी चिपळूण, राजापूर या नगरपरिषदा आणि देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या सदस्यपदाच्या जागांसाठी एकूण ५ अर्ज गुरुवारी दाखल झाले. तर चिपळूणमधून नगराध्यक्षाच्या जागेसाठी एक अर्ज दाखल झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सदस्यांच्या जागांसाठी ७ आणि नगराध्यक्षांच्या जागेसाठी ३ अर्ज आले आहेत.रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या चार नगरपरिषदा तसेच देवरुख, गुहागर आणि लांजा या तीन नगरपंचायतीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन दिवशी म्हणजेच १० आणि ११ नोव्हेंबरला चार नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतीत सदस्य अथवा नगराध्यक्षाच्या जागेसाठी एकही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, बुधवारी सदस्यांच्या जागेसाठी रत्नागिरीत २ आणि खेडमध्ये १ असे एकूण ३ अर्ज तर नगराध्यक्षाच्या जागेसाठी खेड आणि राजापूरमधून प्रत्येकी एक असे एकूण २ अर्ज दाखल झाले होते.गुरुवारी (दि. १३) चिपळूणमधून सदस्याच्या जागेसाठी ३, राजापूर आणि देवरुखमध्ये प्रत्येकी एक असे पाच अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षाच्या जागेसाठी चिपळुणात १ अर्ज दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसातील सदस्यांच्या जागांसाठी आलेल्या एकूण अर्जांची संख्या ७ आणि नगराध्यक्षाच्या जागेसाठी आलेल्या एकूण अर्जांची संख्या ३ असे १० उमेदवारी अर्ज आतापर्यंत आले आहेत.
Web Summary : Ratnagiri district witnessed six nominations for local body elections. Five applications were for council member posts and one for the chairperson's position in Chiplun. Total: seven member and three chairperson applications received so far.
Web Summary : रत्नागिरी जिले में स्थानीय निकाय चुनावों के लिए छह नामांकन हुए। पांच आवेदन परिषद सदस्य पदों के लिए और एक चिपलून में अध्यक्ष पद के लिए था। कुल: अब तक सात सदस्य और तीन अध्यक्ष आवेदन प्राप्त हुए।