खेडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST2021-07-21T04:21:53+5:302021-07-21T04:21:53+5:30

खेड : तालुक्यात सद्यस्थितीत ३०० कोरोना पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह रुग्ण असून, यापैकी १४९ रुग्ण गृह अलगीकरणात तर १५१ रुग्ण विविध ...

The number of active patients in Khed is stable | खेडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या स्थिर

खेडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या स्थिर

खेड : तालुक्यात सद्यस्थितीत ३०० कोरोना पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह रुग्ण असून, यापैकी १४९ रुग्ण गृह अलगीकरणात तर १५१ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

तालुक्यात पहिला रुग्ण गतवर्षी एप्रिलमध्ये आढळल्यानंतर सद्यस्थितीत गेल्या १४ महिन्यात हा आकडा ५,६९८ वर पोहोचला आहे. यापैकी ५,१९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर २०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात ३०० सक्रिय रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत असून, यामध्ये २७ चौदा वर्षांखालील मुलांचा समावेश आहे. गेल्या महिन्यापासून सक्रिय रुग्णांची संख्या सरासरी ३०० च्या जवळपास आहे. तालुक्यातील ३१ ठिकाणी कंटेन्मेंट झोन ॲक्टिव्ह असून, १४९ रुग्ण गृह अलगीकरणात आहेत, तर १५१ रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

Web Title: The number of active patients in Khed is stable