शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

Ratnagiri: तुमचा मृत्यू होणार आहे, तोवर एन्जॉय करा; धमकीच्या चिठ्ठ्यांमुळे खेडमध्ये उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 17:51 IST

खेड : शहरातील एका सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलमधील सर्व दुकानांसमोर विविध तारखा टाकून दुकानमालकांना ठार मारण्याच्या धमक्या लिहिलेल्या चिठ्ठ्या ...

खेड : शहरातील एका सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलमधील सर्व दुकानांसमोर विविध तारखा टाकून दुकानमालकांना ठार मारण्याच्या धमक्या लिहिलेल्या चिठ्ठ्या गुरुवारी सकाळी सापडल्या आणि केवळ खेड शहरच नाही तर जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू झाली. खेडमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. अखेर सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे हा प्रकार काही लहान मुलांनी खोडकरपणातून केला असल्याचे शुक्रवारी उघड झाले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.गुरुवारी सकाळी दुकाने उघडण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्यांना दुकानाच्या शटरमध्ये चिठ्ठी सापडली. अमुक अमुक तारखेला तुमचा मृत्यू हाेणार आहे, तोपर्यंत एन्जॉय करा, असा संदेश त्यावर लाल शाईच्या पेनाने इंग्रजीमध्ये लिहिण्यात आला होता. हे पाहून शॉपिंग मॉलमधील व्यापारी चांगलेच धास्तावले. यासंदर्भात खेड पोलिस स्थानकाकडे तक्रारीही देण्यात आल्या. या अजब प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.खेड पोलिसांनी या संदर्भात डिटेक्टिव्ह ब्रँचच्या माध्यमातून शीघ्रगतीने तपास सुरू केला. गुरुवारी सायंकाळपर्यंत एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले. पण ते खूपच बाहेरील बाजूचे होते. त्यामुळे पोलिसांना निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नव्हते. शुक्रवारी सकाळी मॉलबाजूच्या एका दुकानदाराकडे जे सीसीटीव्ही फुटेज मिळाले, त्यावरून हा उद्योग लहान मुलांनी केला असल्याचे स्पष्ट झाले.लहान मुलांनी सोशल मीडियावर पाहून केलेला हा खोडकरपणा लक्षात घेऊन तक्रारदारांनी तक्रार मागे घेतली. मात्र पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलावून योग्य समज देऊन मुलांना समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मॉलच्या मालकांनीदेखील त्यांच्या पालकांना सूचना देत तक्रार मागे घेतली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKhedखेडPoliceपोलिस