शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Bhaskar Jadhav: ‘नाॅट रिचेबल’ आमदार भास्कर जाधव चिपळुणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 12:54 IST

नेटवर्क नसल्याने आपला फाेन ‘नाॅट रिचेबल’ हाेता मी शिवसेनेतच असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाेबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

चिपळूण : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या गाेटात शिवसेनेचे एक-एक आमदार दाखल हाेत आहेत. त्यातच आमदार भास्कर जाधव यांचा फाेन कालपासून ‘नाॅट रिचेबल’ झाल्याने चर्चेला एकच उधाण आले हाेते. मात्र, भास्कर जाधव हे सकाळी चिपळुणात दाखल झाले असून, नेटवर्क नसल्याने आपला फाेन ‘नाॅट रिचेबल’ हाेता मी शिवसेनेतच असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाेबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना शिवसेनेच्या काही आमदारांनी पाठिंबा दिला असून, हे सारे आमदार गुवाहाटीत ठाण मांडून आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या बंडाळीनंतर त्यांच्या साेबत आणखी काेण काेण आमदार जाणार याची चर्चा जाेरात सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव आमदार याेगेश कदम सध्या एकनाथ शिंदे यांच्या गाेटात सामील झाले आहेत. त्यांच्यानंतर आणखी काेण आमदार गुवाहाटीला जाणार का, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यातच काल रात्रीपासून आमदार भास्कर जाधव यांचा फाेन ‘नाॅट रिचेबल’ झाल्याने आमदार भास्कर जाधवही गुवाहाटीला गेल्याची चर्चा सुरु झाली हाेती. शुक्रवारी सकाळपर्यंत त्यांचा फाेन ‘नाॅट रिचेबल’ लागल्याने साऱ्यांची घालमेल सुरु झाली हाेती.एकनाथ शिंदे सुरतला दाखल झाले त्यावेळी आमदार भास्कर जाधव चिपळुणात हाेते. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यानंतर दुपारी ते मुंबईला रवाना झाले हाेते. गेले तीन दिवस ते मुंबईतच हाेते. गुरुवारी रात्री ते मुंबईतून चिपळूणकडे येण्यासाठी निघाले हाेते. शुक्रवारी सकाळी ते चिपळुणात दाखल झाले. यादरम्यान त्यांच्या माेबाईलला रेंज नसल्याने ‘नाॅट रिचेबल’ लागत हाेता. मात्र, सध्या ते चिपळुणात असून, पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधवUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ