शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षात जमलं नाही, ते आठवड्यात झालं

By admin | Updated: July 3, 2014 00:36 IST

जिल्हा परिषद : निलंबनाच्या कारवाईनं सगळं जमवलं !

रत्नागिरी : कारवाईचा बडगा उगारला की, कर्मचाऱ्यांचा कामाचा ‘उत्साह’ किती वाढू शकतो, हे ग्रामसेवकांच्या ‘शक्ती’ने दाखवून दिले आहे. जन्म-मृत्यू नोंदीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ग्रामसेवकांना निलंबित करताच उर्वरित ग्रामसेवकांनी ताकद पणाला लावली आणि दोन वर्षे रखडलेले काम केवळ आठवडाभरात पूर्णत्त्वाकडे नेताना चक्क ४ लाख जन्म-मृत्यूच्या नोंदीचे संगणकीकरण केले.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उगारताच आठवडाभराच्या कालावधीत सुमारे ४ लाख जन्म-मृत्यू नोंदीचे संगणकीकरण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामसेवक कारवाईच्या धसक्याने ग्रामपंचायतींमधील जन्म-मृत्यू संगणकीकरणाच्या कामात व्यस्त आहेत. जे काम गेल्या दोन वर्षांत झाले नाही, ते केवळ एका आठवड्यात कसे झाले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून, त्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. या संगणकीकरणामुळेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची विकासकामे ई-टेंडरिंगने करण्यात येत आहेत. मात्र, अनेक ग्रामपंचायती त्यामध्येही चालढकल करीत असल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.सर्व ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करण्यात आल्यानंतर जन्म-मृत्यूची नोंद संगणकीकृत करणे आवश्यक होते. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून जन्म-मृत्यूच्या केवळ दीड लाख नोंदी करण्यात आल्या होत्या. या नोंदींबाबतचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी घेतला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत नापसंती व्यक्त करुन कारवाईची धडक मोहीमच उघडली. त्यांनी याप्रकरणी चार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे ग्रामसेवकांसह जिल्हा परिषदेच्या इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्येही खळबळ उडाली होती. कारवाईच्या धडकेने ग्रामसेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जन्म-मृत्यूच्या नोंदी आतापर्यंत केवळ दीड लाखापर्यंत संगणकीकृत करण्यात आल्या होत्या. मात्र, कारवाईनंतर या नोंदी संगणकीकरण करण्याच्या कामाला वेग आला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवडाभराच्या कालावधीत सुमारे ४ लाख जन्म-मृत्यूच्या नोंदी संगणकीकृत करण्यात आल्या. आतापर्यंत जन्माच्या ४ लाख २८ हजार आणि मृत्यूच्या २ लाख ५४ हजार नोंदी करण्यात आल्या. (शहर वार्ताहर)