रत्नागिरीत २८ पासून अनिवासी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:33 IST2021-09-25T04:33:23+5:302021-09-25T04:33:23+5:30

असगोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत मत्स्य संवर्धन विभागातर्फे रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य ...

Non-resident training from 28 in Ratnagiri | रत्नागिरीत २८ पासून अनिवासी प्रशिक्षण

रत्नागिरीत २८ पासून अनिवासी प्रशिक्षण

असगोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत मत्स्य संवर्धन विभागातर्फे रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय येथे २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय मात्स्यिकी विकास बोर्ड पुरस्कृत निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन या विषयावर तीन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

कार्यक्रम राष्ट्रीय मात्स्यिकी विकास बोर्डाच्या नियम आणि अटी नुसार प्रत्यक्ष उपस्थितीसह कोविड-१९ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षण नि:शुल्क असून, प्रशिक्षणार्थींची निवड ही महाराष्ट्रातील प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लाभधारक आणि संभाव्य कोळंबी संवर्धकातून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य प्रमाणे करण्यात येईल. प्रशिक्षणार्थींची संख्या ५० पर्यंत सीमित आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमातील सैंधातिक आणि प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थिती आवश्यक असून, त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.

Web Title: Non-resident training from 28 in Ratnagiri