रत्नागिरी : रायगड येथे बदली झालेल्या खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या जागी देवरुखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खेड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची झालेली जवळीक सुवर्णा पत्की यांना भोवल्याची चर्चा आहे.राजकीय कार्यक्रमांना परवानगी देणे तसेच त्या कार्यक्रमांना मास्क न लावता उपस्थित रहाणे या विविध कारणांमुळे वादग्रस्त झालेल्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची बदली व्हावी यासाठी विधान परिषदेचे आमदार रामदास कदम यांनी मागणी केली होती. यावेळी त्यांनी सुवर्णा पत्की यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले होते. रामदास कदम यांनी केलेल्या मागणीची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्की यांची बदली रायगड येथे केली.पत्की यांच्या जागी रायगडच्या बाळकृष्ण जाधव यांची बदली झाली होती. मात्र त्यात बदल झाला असून, नव्या आदेशानुसार देवरुखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांची खेडला बदली करण्यात आली असल्याचे समजते. आता देवरूख येथे निशा जाधव यांच्या जागेवर मारुती जगताप यांची तर नाटे पोलीस स्थानकामध्ये आबासाहेब पाटील यांची बदली करण्यात आली आहे. गुहागरचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांची दाभोळ येथे बदली करण्यात आली आहे.
खेड पोलीस निरीक्षकपदी निशा जाधव, सुवर्णा पत्की यांची रायगड येथे बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 17:29 IST
Police Transfar Rantagiri- रायगड येथे बदली झालेल्या खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या जागी देवरुखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खेड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची झालेली जवळीक सुवर्णा पत्की यांना भोवल्याची चर्चा आहे.
खेड पोलीस निरीक्षकपदी निशा जाधव, सुवर्णा पत्की यांची रायगड येथे बदली
ठळक मुद्देखेड पोलीस निरीक्षकपदी निशा जाधव, सुवर्णा पत्की यांची रायगड येथे बदली राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती भोवली, रामदास कदम यांनी उठवला होता आवाज