शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

‘माविम’मुळे नऊ हजार महिला ‘घर’ मालकीण

By admin | Updated: November 19, 2015 00:43 IST

रत्नागिरी जिल्हा : ग्रामसभेच्या मान्यतेनंतर निर्णय

रत्नागिरी : महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटाच्या चळवळीने नेत्रदीपक प्रगती केली आहे. महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होऊ लागल्याने जिल्ह्यातील ९२४४ महिलांचे नाव घराच्या कागदोपत्री लागण्याच्या प्रस्तावांना संबंधित ग्रामसभेने मान्यता दिली आहे. त्यापैकी तब्बल २४४४ महिला प्रत्यक्षात ‘घर मालकीण’ बनल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात ‘माविम’मुळे ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांचे कष्ट कमी झाले. आज निरक्षर महिलाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीबरोबरच इतरही पूरक व्यवसाय करून पतीबरोबरच अर्थार्जन करू लागली आहे. आज तिची घरातील पत वाढली आहे. एवढेच नव्हे; तर गावच्या विकासातही तिचा सहभाग वाढला आहे. झेंडावंदनाला महिला आवर्जुन उपस्थित राहू लागल्या असून, ग्रामसभांमध्येही भाग घ्यायला लागल्या आहेत. त्यांच्यात धाडस आणि आत्मविश्वास आला आहे. माविमचे महिलांच्या विकासाचे कार्य चार टप्प्यात चालते. त्यातील एक टप्पा म्हणजे महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समानता. याचाच एक भाग म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री - पुरूष समानता यावी, घराची मालकी पतीप्रमाणेच पत्नीकडेही यावी, या उद्देशाने शासनाने ‘घर दोघांचे’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेऊन तसा अध्यादेशही काही वर्षांपूवी काढला आहे. या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटाने ‘घर दोघांचे’ ही संकल्पना ग्रामीण भागात चांगलीच रूजवली आहे. अर्थार्जनात पत्नीचा समान वाटा आहे, तर मग तिला घराच्या मालकीत तो का मिळू नये, ही विचारधारा ग्रामीण भागात रूजवण्यात माविमचे जिल्हा समन्वयक दीपक भागवत आणि जिल्ह्यातील त्यांच्या संयोगिनींचा महत्त्वाचा वाटा आहे. ग्रामीण भागात माविमने केलेल्या समाजप्रबोधनामुळे पुरूषवर्गाची मानसिकता बदलली आहे. त्यामुळे पती आपल्या बरोबरच पत्नीचे नाव लावण्यासाठी तयारी दर्शवू लागले आहेत. पुरूषवर्गाने माविमच्या ‘घर दोघांचे’ या चळवळीला सकारात्मक दर्शवलेल्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील ९२४४ महिलांची नावे पतीबरोबरच लागण्यासाठीच्या प्रस्तावांना ग्रामसभेत मान्यता मिळाली असून, त्यापैकी २४४४ महिलांची नावे पतीसह सातबारा तसेच घरपट्टीवर आली आहेत. त्यामुळे घराचे मालक असलेल्या पतीराजांबरोबरच आता पत्नीही ‘घर मालकीण’ बनू लागल्या आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल खूप मोठे असल्याचे मानले जात आहे. (प्रतिनिधी)