आंबा बागेतील दोन नेपाळी भावांचा खून, दुसऱ्या खुनाच्या घटनेने रत्नागिरी हादरली
By मनोज मुळ्ये | Updated: April 30, 2024 16:02 IST2024-04-30T16:01:56+5:302024-04-30T16:02:54+5:30
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे दोन नेपाळी सख्ख्या भावांचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीला आली. या दोघांवर ...

आंबा बागेतील दोन नेपाळी भावांचा खून, दुसऱ्या खुनाच्या घटनेने रत्नागिरी हादरली
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे दोन नेपाळी सख्ख्या भावांचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीला आली. या दोघांवर तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर प्रहार करून आणि डाेक्यात दगड घालून हा खून केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. रत्नागिरी शहरात शनिवारी वाॅचमनचा निर्घृण खून केल्याची घटना ताजी असतानाच खुनाच्या दुसऱ्या घटनेने रत्नागिरी हादरली आहे.
रत्नागिरी - पावस मार्गावरील गाेळप येथे मुकादम यांच्या बागेत ही घटना घडली आहे. दाेघे भाऊ सहा महिन्यांपासून बागेत रखवालीचे काम करत हाेते. मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराला बागेत दाेघांचे मृतदेह आढळले. दाेन्ही भावांच्या डाेक्यात धारधार शस्त्राने वार करत आणि डाेक्यात दगड घालून खून केल्याचे दिसत हाेते. हा खून साेमवारी रात्री केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती पाेलिसांना मिळताच पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, रत्नागिरीचे पाेलिस उपविभागीय अधिकारी नीलेश माईनकर यांच्यासह पूर्णगड पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मृतदेहांचा पंचनामा करुन ताे उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. घटनास्थळी श्वान पथकही दाखल झाले आहे. या खुनामागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून पाेलिस अधिक तपास करत आहेत.