'एमपीएल'मुळे युवा गुणवान खेळाडूंना संधी; लिलावासाठी नोंदणीकृत खेळाडू किती, कधी होणार स्पर्धा, रोहित पवारांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 19:20 IST2025-05-13T19:19:27+5:302025-05-13T19:20:18+5:30
दापोली : महाराष्ट्र प्रीमिअर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या ओनाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार आहे. या ...

'एमपीएल'मुळे युवा गुणवान खेळाडूंना संधी; लिलावासाठी नोंदणीकृत खेळाडू किती, कधी होणार स्पर्धा, रोहित पवारांनी दिली माहिती
दापोली : महाराष्ट्र प्रीमिअर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या ओनाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार आहे. या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आमदार रोहित पवार यांनी दिली. मे ते जूनदरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दापोली येथील रॉयल गोल्ड फील्ड संकुलात आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र प्रीमिअर लीगची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मानद सचिव ॲड. कमलेश पिसाळ, रॉयल गोल्ड फिल्डचे अनिल छाजेड, एमपीएलचे अध्यक्ष सचिन मुळे, तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य सुनील मुथा, विनायक द्रविड, सुशील शेवाळे, रणजीत खिरीड, मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी, बिपिन बंदरकर उपस्थित होते.
रोहित पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रीमिअर लीग हा केवळ एक स्पर्धात्मक मंच नसून, एक परिवार आहे. संघमालक, खेळाडू, पदाधिकारी, तांत्रिक टीम आणि कर्मचारी यांचे परिश्रम या यशामागे आहेत. राज्याच्या कोनाकोपऱ्यात व तळागाळात क्रिकेटचा प्रचार व प्रसार व्हावा, होतकरू व गुणी खेळाडूंना आपले टॅलेंट दाखवण्याचा प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) व विमेन्स महाराष्ट्र प्रीमिअर लीग (डब्लूएमपीएल) २०२५ साठी खेळाडूंचा लिलाव पुणे येथे एप्रिल महिन्यात पार पडला. या वर्षीच्या लिलावासाठी ४०९ पुरुष खेळाडू आणि २४९ महिला खेळाडू नोंदणीकृत होते, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
गुणवत्ता दाखविण्याची संधी
पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी रत्नागिरी जेट्स, रायगड रॉयल्स व पुष्प सोलापूर, पीबीजी कोल्हापूर टस्कर्स, उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी ईगल नाशिक टायटन्स, पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ४ एस पुणेरी बाप्पा या संघाच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे.