शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, खासदार नारायण राणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:50 IST

रत्नागिरी : महामार्गाच्या कामास उशीर झाल्याने ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधीत या कामात दिरंगाई झाली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना ...

रत्नागिरी : महामार्गाच्या कामास उशीर झाल्याने ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधीत या कामात दिरंगाई झाली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी दिली. ते रत्नागिरीत येथे आढावा बैठकीसाठी आले होते.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीची माहिती खासदार राणे यांनी दिली. राजापूर येथील अर्जुना नदीतील गाळ काढणे, मुंबई-गोवा महामार्गाचे अपूर्ण काम, चिपळूण पूरहानी तसेच वाशिष्ठी नदीतील गाळ काढणे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. रत्नागिरी विमानतळ सुरू होण्याबद्दल, जयगड येथील जिंदल कंपनीतील वायूगळतीमुळे विद्यार्थ्यांना झालेला त्रास अशा विषयांमध्ये काय कारवाई करण्यात आली, याची माहिती विचारताना खासदार राणे यांनी चिपळूण विमानतळाबाबत जागा संपादित केली आहे का, याचाही आढावा घेतला.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणारे दोन ठेकेदार यापूर्वीच पळून गेले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कामासाठी शासनाकडून तिसरा ठेकेदार नेमला आहे. हा ठेकेदार मध्येच काम सोडून जाऊ नये, याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे संबंधितांकडून सांगण्यात आले. मात्र, आपण हे काम एप्रिलपर्यंत पूर्ण करा, असे आदेश दिले आहेत. कारण मे महिन्यात काम झाले नाही तर पुढे पावसाळा आला आहे. आता ते काम कसे पूर्ण करणार, असे कारण पुढे करण्यात येईल. त्यासाठीच महामार्गाचे काम मे महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गNarayan Raneनारायण राणे