शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: July 9, 2014 23:30 IST

मागण्या प्रलंबित : शासकीय कार्यालये झाली सामसूम...

रत्नागिरी : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पहिल्या टप्प्यात केलेल्या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी आज (बुधवार) अखेर दुसऱ्या टप्प्यातील एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. त्यामुळे दिवसभर अधिकारीवगळता सर्व कार्यालयांमध्ये सामसूम होती. महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेने यापूर्वीही टप्प्याटप्प्याने आंदोलन केले होते. मात्र, २० आॅगस्ट २०१३ रोजी मागण्या तत्वत: मान्य झाल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. लेखी मागण्या मान्य होऊनही त्यांची पूर्तता न झाल्याने संघटनेने आता राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आज दुसऱ्या टप्प्यातील धरणे आंदोलन जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आले. प्रांताधिकारी कार्यालयासमोर असलेल्या महापुरूष मंदिरानजीक हे धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्ह्यातील वर्ग - ३ आणि ४ चे सुमारे २५० महसूल कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी यांना शासनाकडे सादर करण्यासाठी संघटनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचीही शासनाने दखल न घेतल्यास येत्या १४ रोजी एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही मागण्यांची पूर्तता न झाल्यास १ आॅगस्टपासून संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे.दरम्यान, आज महसूल कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभाग अधिकारीवगळता कर्मचाऱ्यांविना रिक्त झालेले दिसत होते.या आंदोलनाची नागरिकांनाही माहिती असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची गर्दी आज तुरळक होती. मात्र काही लोकांचा यामुळे खोळंबा झालेला दिसून येत होता. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार असूनही शुकशुकाट असल्याने अनेक कामे प्रलंबित राहिल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिक, सर्व चतुर्थ कर्मचारी आणि चालक असे कर्मचारी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)