चुलालोन्गकोर्न युनिव्ह्रर्सिटीत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या संधी : डॉ. प्रशांत बोडके

By शोभना कांबळे | Published: October 31, 2023 03:28 PM2023-10-31T15:28:43+5:302023-10-31T15:29:32+5:30

रत्नागिरी : थायलंड येथील चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास दापोली काेकण कृषी ...

MoU between Konkan Agricultural University and Thailand University in Thailand | चुलालोन्गकोर्न युनिव्ह्रर्सिटीत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या संधी : डॉ. प्रशांत बोडके

चुलालोन्गकोर्न युनिव्ह्रर्सिटीत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या संधी : डॉ. प्रशांत बोडके

रत्नागिरी : थायलंड येथील चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास दापोली काेकण कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि शिक्षण संचालक प्रा. डॉ. प्रशांत बोडके यांनी विद्यापीठ आणि थायलंड युनिव्हर्सिटी यांच्यात थायलंड येथे झालेल्या सामंजस्य करारादरम्यान काढले.

दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत जागतिक बॅक अनुदानित व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली संचलित राष्ट्रीय कृषी शिक्षण प्रकल्पांतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली थायलंड येथील नामांकित चुलालोन्गकोर्न युनिव्हसिटी आणि कोकण कृषी विद्यापीठ यांच्यादरम्यान शिक्षण, संशोधन या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

कोकण कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि चुलालोन्गकोर्न विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. बंदित युवा आरपोर्न यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सानिपा सुरादत्त यांनी थायलंड येथील चुलालोन्गकोर्न विद्यापीठात थायलंडचे भारतीय राजदूत, थायलंड येथील कार्यालयाचे डेप्युटी हायकमिशनर पाैलोमी त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. डॉ. सानिपा सुरादत्त यांनी भविष्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले.

हा सामंजस्य करार यशस्वी करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिंगारे, राष्ट्रीय कषी उच्चशिक्षण प्रकल्पाचे उप प्रकल्प समन्वयक डॉ. अतुल मोहोळ, डॉ. संतोष सावर्डेकर, संशोधन उपसंचालक डॉ. संजय तोरणे, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुरेश नाईक, विभाग प्रमुख डॉ. अनिल पावसे, डॉ. बाळासाहेब चव्हाण तसेच चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटी मधील डॉ मनोज आणि डॉ सीमा कांबळे यांचे सहकार्य लाभले.

यावंळी चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटी मधील डॉ. नोपाडॉन , डॉ चन्नारॉग, डॉ अरण्य, डॉ मनोज कांबळे, डॉ सीमा कांबळे तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामधील डॉ. बाळासाहेब चव्हाण, मत्स्य महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वप्निल जाधव, प्राची डोंगरे, देवरंजनी के, गार्गी पात्लरेकर, रोहित आपटे, विराज दवंडे, अमरेंद्र कुमार उपस्थित होते.

चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सामंजस्य करार यांच्या माध्यमातून दोन्ही विद्यापीठांमधील पदवी पदव्युत्तर विद्यार्थी यांना संशोधन करण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थ्याची दोन्ही विद्यापीठांमध्ये संशोधन करण्यासाठी संशोधन सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच दोन्ही विद्यापीठातील शिक्षकांची संशोधन कार्यासाठी देवाणघेवाण होऊ शकणार आहे.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या महिन्यापासून शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातील सात विद्यार्थी आणि तीन प्राध्यापक यांच्याकरिता ‘मत्स्य आणि मत्स्य संवर्धन’ हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण आयोजित केले आहे. तसेच दोन्ही विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘तिलापिया संवर्धनाच्या शाश्वत विकासातील प्रगती‘ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे.

Web Title: MoU between Konkan Agricultural University and Thailand University in Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.