शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

सकाळी काँग्रेसमध्ये, दुपारी भाजपची सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 1:23 PM

Rajapur Sarpacnch Bjp Ratnagiri- निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झालेल्या महिला सदस्याने बुधवारी सकाळी अचानक भाजपत जाहीर प्रवेश करून दुपारी सरपंचपद मिळवले. तालुक्यातील पांगरे बुद्रुक ग्रामपंचायतीमधील या नाट्यमय घडामोडीने तालुक्यात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

ठळक मुद्देसकाळी काँग्रेसमध्ये, दुपारी भाजपची सरपंचनाट्यमय घडामोडीने तालुक्यात चांगलीच खळबळ

राजापूर : निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झालेल्या महिला सदस्याने बुधवारी सकाळी अचानक भाजपत जाहीर प्रवेश करून दुपारी सरपंचपद मिळवले. तालुक्यातील पांगरे बुद्रुक ग्रामपंचायतीमधील या नाट्यमय घडामोडीने तालुक्यात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत हा सनसनाटी प्रकार पाहायला मिळाला. काँग्रेसकडून निवडून आलेल्या वैष्णवी संतोष कुळ्ये यांनी अचानक भाजपात प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यानंतर, भाजपकडून सरपंचपदाची निवडणूक लढवून त्यांनी शिवसेनेच्या अवंतिका जयवंत पवार यांचा पराभव केला. पाठोपाठ भाजपच्या अनुजा सत्तेश पवार यांनी शिवसेनेचे विश्वनाथ दत्ताराम सावंत यांचा पराभव करून उपसरपंचपदाची निवडणूकही जिंकली.काँग्रेसच्या अन्य दोन सदस्यांनी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे. पांगरेमधील सरपंच व उपसरपंचाच्या निवडणुकीसाठी प्रभाकर तुकाराम बेंद्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.पांगरे बुद्रुक ग्रामपंचायतीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. सात जागांपैकी शिवसेना व काँग्रेसने ३/३ जागा जिंकल्या, तर एक जागा भाजपाने पटकावली होती. त्यामुळे सरपंच व उपसरपंचपदासाठी जोरदार चुरस निर्माण झाली होती. कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने युती वा आघाडीचे समीकरण जुळविले जाण्याची शक्यता वर्तविली जात होती.

राज्यातील राजकारणात शिवसेना व भाजपचे संबंध बिघडले असले, तरी शिवसेनेचे तीन व भाजपचा एक असे चार सदस्य युती करून सत्ता स्थापणार की, येथेही महाविकास आघाडीची सत्ता येणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.प्रत्यक्षात, सर्वच राजकीय आडाखे चुकीचे ठरविणारी घटना बुधवारी घडली. काँग्रेसकडून सरपंचपदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या वैष्णवी संतोष कुळ्ये यांनी अचानक भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्या उपस्थितीत भाजपत जाहीर प्रवेश केला. त्यांना भाजपकडून सरपंचपदासाठी, तर भाजपच्या एकमेव निवडून आलेल्या सदस्या अनुजा सत्तेश पवार यांना उपसरपंच पदाची, तर शिवसेनेकडून सरपंच पदासाठी अवंतिका जयवंत पवार आणि उपसरपंचपदासाठी विश्वनाथ सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, भाजपने शिवसेनेसह काँग्रेसला धोबीपछाड देताना पांगरे बुद्रुकमध्ये कमळ फुलविले.

 

टॅग्स :sarpanchसरपंचBJPभाजपाRajapurराजापुरRatnagiriरत्नागिरी