शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीच्या समर्थनार्थ विधानभवनावर धडकणार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

राजापूर : राज्याच्या कठीण आर्थिक स्थितीत कोकणात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुले समर्थन ...

राजापूर : राज्याच्या कठीण आर्थिक स्थितीत कोकणात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुले समर्थन दिलेले असतानाच आता मुंबईस्थित तालुकावासीय आणि मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी प्रकल्पासाठी राजापूरवासीयांना आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवनावरच प्रचंड मोर्चा काढण्यासाठी एकत्र या, असे आवाहन त्यांनी तालुक्यातील सर्वपक्षीयांना केले आहे.

काही महिन्यांपूर्वी तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठी जे राजकीय पक्ष एनजीओंच्या प्रभावामुळे विरोध करत होते, त्यापैकी शिवसेना वगळून इतर सर्वच राजकीय पक्ष आता रिफायनरीचे समर्थन करत आहेत. तर नाणार परिसरातील अनेक गावांमधून आता या रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर समर्थन वाढत आहे. या भागातील सुमारे दीड हजार कुटुंबांनी आपल्या जमिनी स्वखुशीने या प्रकल्पाला देण्यासाठीची संमतीपत्र दिलेली आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे १४ हजार एकर जमिनीची नाणार परिसरात गरज असून, त्यापैकी सुमारे साडेआठ हजार एकरची संमतीपत्र येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेली आहेत. त्यामुळे आता या प्रकल्पाला विरोध राहिलेला नाही. त्यामुळे शासनाने आता हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

नाणार येथे रिफायनरी प्रकल्प करण्यास आता फक्त शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे तालुक्यामधून आता हा प्रकल्प बारसू सोलगाव परिसरात उभारावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याठिकाणी सर्वांनीच समर्थन दिलेले आहे. तरीही राज्य सरकार या प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याने व त्यातच या प्रकल्पाची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन विदर्भात केलेली आहे. कोकणात या प्रकल्पाची नितांत गरज असून, हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशन काळात विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी केले आहे.