स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठासाठी रत्नागिरीत मनसेचे धरणे आंदोलन, सरकारला दिला इशारा
By अरुण आडिवरेकर | Updated: December 19, 2022 15:33 IST2022-12-19T15:33:11+5:302022-12-19T15:33:49+5:30
सरकारकडून सकारात्मक पाऊले न उचलली गेल्यास मनसे स्टाईल आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला

स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठासाठी रत्नागिरीत मनसेचे धरणे आंदोलन, सरकारला दिला इशारा
रत्नागिरी : स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ झाले पाहिजे यासाठी सोमवारी (१९ डिसेंबर) रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनातमनसे प्रवक्ते योगेश चिले, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, चिपळूण शहर अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर, अरविंद मालाडकर, महिला तालुका सचिव आकांक्षा पाचकुडे, महिला शहर अध्यक्ष अंजली सावंत, कामगार सेना जिल्हा चिटणीस सुनील साळवी तसेच रत्नागिरी तालुका मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या लाक्षणिक धरणे आंदोलनाची समाप्ती निवासी जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन करण्यात आली. येत्या काही दिवसांत स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठाबाबत सरकारकडून सकारात्मक पाऊले न उचलली गेल्यास मनसे स्टाईल आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला