शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आमदार योगेश कदम यांच्या शुभेच्छा फलकावर छेडछाड, दापोली-खेड मार्गावर शिंदेसेनेचा रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 16:55 IST

दापोली : तालुक्यातील टाळसुरे येथे आमदार योगेश कदम व त्यांच्या पत्नीचा फोटो असलेल्या गौरी गणपतीच्या शुभेच्छांच्या फलकाची छेडछाड करण्यात ...

दापोली : तालुक्यातील टाळसुरे येथे आमदार योगेश कदम व त्यांच्या पत्नीचा फोटो असलेल्या गौरी गणपतीच्या शुभेच्छांच्या फलकाची छेडछाड करण्यात आल्याने शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेत वाहतूक पूर्ववत करण्यात आली.दापोली खेड मार्गावरील टाळसुरे येथे लावलेल्या फलकावर छेडछाड करण्यात आल्याचे कळल्यानंतर तालुक्यात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच नीलेश शेठ यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कार्यकर्त्यांनी दापोली खेड मार्गावर ठिय्या आंदोलन केले. काही काळ वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.आमदार योगेश कदम व त्यांच्या पत्नीचे छायाचित्र असलेले गौरी गणपतीच्या शुभेच्छा देणारे फलक तालुक्यात सर्वत्र लावण्यात आले आहेत. यातील एका फलकाची छेडछाड करण्यात आल्याचे काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर शिवसैनिक हळूहळू एकत्र जमायला सुरुवात झाली. सर्व कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आणि सर्व जण रस्त्यावरच ठिय्या मारून बसले. तोपर्यंत पोलिसही तेथे आले. त्यांनी विनंती केल्याने आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको मागे घेण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीYogesh Kadamयोगेश कदमShiv Senaशिवसेना