शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत भाजपला धक्का, तब्बल ५७ पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:05 IST

नाराज कार्यकर्त्यांनी मांडली भूमिका

रत्नागिरी : तालुक्यातील कुवारबाव पंचायत समिती गणात भाजपला तिकीट नाकारल्याने आणि नैसर्गिक युतीत अन्यायकारक वागणूक मिळाल्याच्या भावनेतून भाजपच्या तब्बल ५७ प्रमुख आणि सक्रिय पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या या राजीनाम्यांमुळे महायुतीत फूट पडल्याचे पुढे आले आहे.कुवारबाव पंचायत समिती गणावर भाजपने दावा केला होता. मात्र, महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला देण्यात आली नाही. त्याचबराेबर अपेक्षित उमेदवाराला तिकीटही नाकारण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या गणात एकूण ५७ सक्रिय कार्यकर्ते आाणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई यांच्याकडे दिले आहे.कुवारबाव हा रत्नागिरी शहराजवळील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ५७ सक्रिय पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने भाजपसमोर आणि पर्यायाने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या असंतोषाचा फायदा विरोधकांना होणार का? वरिष्ठ नेते ही बंडखोरी थंड करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नाराज कार्यकर्त्यांनी मांडली भूमिकाआम्ही यापुढे भाजपच्या कोणत्याही संघटनात्मक कार्यात सहभागी होणार नाही. आम्ही पक्षाचे फक्त ‘शुभचिंतक’ आणि ‘मतदार’ म्हणून राहू, असे त्यांनी जाहीर केले आहे. महायुतीतील अंतर्गत कलह आणि स्थानिक पातळीवर होणारा अन्याय यामुळे हा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

मी फक्त हे राजीनामे स्वीकारले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना आणि हे राजीनामे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्याकडे पाठवले जातील. - प्रतीक देसाई, तालुकाध्यक्ष

English
हिंदी सारांश
Web Title : Setback for BJP in Ratnagiri: 57 Officials Resign En Masse

Web Summary : Upset over being denied a ticket and perceived unfair treatment within the alliance, 57 BJP officials in Ratnagiri's Kuwarbav resigned. This mass resignation highlights fissures within the ruling coalition ahead of elections, posing a challenge for senior leaders.