मैत्रिणींसोबत समुद्रात गेली, सांगलीतील विवाहिता बेपत्ता झाली; गणपतीपुळे येथील घटना

By मनोज मुळ्ये | Updated: January 23, 2024 18:37 IST2024-01-23T18:36:35+5:302024-01-23T18:37:05+5:30

गणपतीपुळे : मैत्रिणींसोबत आंघोळीसाठी पाण्यात गेलेली विवाहित महिला गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी श्रीक्षेत्र गणपतीपुळे ...

Married woman from Sangli goes missing in Ganpatipule sea | मैत्रिणींसोबत समुद्रात गेली, सांगलीतील विवाहिता बेपत्ता झाली; गणपतीपुळे येथील घटना

मैत्रिणींसोबत समुद्रात गेली, सांगलीतील विवाहिता बेपत्ता झाली; गणपतीपुळे येथील घटना

गणपतीपुळे : मैत्रिणींसोबत आंघोळीसाठी पाण्यात गेलेली विवाहित महिला गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी श्रीक्षेत्र गणपतीपुळे (ता.रत्नागिरी) येथे घडली. ही महिला सांगली येथील राहणारी असून, सुनीता रामचंद्र पाटील उर्फ निकिता (वय-५७, रा.मांगले, ता.शिराळा) असे त्यांचे नाव आहे.

सुनीता पाटील या गणपतीपुळे येथे आपल्या मैत्रिणींसह पर्यटनासाठी आल्या होत्या. देवदर्शन झाल्यानंतर सर्व जणी गणपतीपुळेतील समुद्रामध्ये आंघाेळीसाठी गेल्या होत्या. समुद्राच्या पाण्यात आंघाेळीचा आनंद लुटत असताना, सुनीता या आजूबाजूला नसल्याचे मैत्रिणींच्या लक्षात आले. त्या अचानक गायब झाल्याने त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिला घाबरून गेल्या. या महिलांनी त्यांच्या राहत्या घरी संपर्क साधला. त्यांच्या पतीला याबाबत माहिती दिल्यानंतर पती रामचंद्र आबा पाटील साेमवारी गणपतीपुळे येथे दाखल झाले. त्यांनी आपली पत्नी गणपतीपुळे समुद्रावरून गायब झाल्याची फिर्याद जयगड पोलिस स्थानकात दिली.

रामचंद्र पाटील यांनी पाेलिस स्थानकात फिर्याद देताच, जयगड पाेलिस स्थानकात याबाबत नाेंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिसांनी तपास सुरू केला. 

Web Title: Married woman from Sangli goes missing in Ganpatipule sea